जनावरे चरायला घेऊन गेलेल्या इसमाचा मृत्यू...#Death of a young man taking cattle to graze - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



जनावरे चरायला घेऊन गेलेल्या इसमाचा मृत्यू...#Death of a young man taking cattle to graze

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

ब्रम्हपुरी तालुक्यातील धानोलीपोहा चक येथे आज सांयकाळी 5.30 वाजता वादळी वाऱ्यासह पाऊस व विजाचा कडकडाट सुरू झाले. धानोलीपोहा चक येथील नवलाजी बळीजी लडके वय 39 हे आपले जनावरे घेऊन गावाबाहेर चारत असताना अचानक विजाचा कडकडाट सुरू झाले.#khabarkatta chandrapur 

अचानक विज त्यांच्या अंगावर पडुन जागीच मृत्यू झाला. यांची माहिती होताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. लगेच यांची माहिती पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले व मुत्युदेह शवविच्छेदन साठी ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी पाठविण्यात आले. नवलाजी हा घरचा कर्ता व्यक्ती असुन अचानक झालेल्या मुत्यु लडके परिवारात खूप मोठे दु:खाचे डोंगर कोसळले आहे. त्याच्या पश्चात पत्नी एक मुलगा व मुलगी असा आप्तपरिवार आहे. सदर घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.#khabarkatta chandrapur

पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस करत आहेत.

Pages