लग्नावरून वरात घेऊन येताना भीषण अपघात: 14 वरती जखमी...#Fatal accident while bringing groom from wedding: 14 injured - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



लग्नावरून वरात घेऊन येताना भीषण अपघात: 14 वरती जखमी...#Fatal accident while bringing groom from wedding: 14 injured

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:सिंदेवाही: पळसगाव (चिखलगाव) नजीक लग्नाच्या वरातीला घेवून जाणाऱ्या ट्रैवल्स चा मागील टायर फुटल्याने झालेल्या अपघातात अंदाजे 14 वराती जखमी झाले. ही घटना रविवार दि. 23 एप्रिल च्या संध्याकाळी तीन ते चार वाजता दरम्यान घडली.#khabarkatta chandrapur

चंद्रपूर जिल्ह्यात आज दुपारी चंद्रपूर-नागपूर महामार्गावर खाजगी ट्रॅव्हल्स व ट्रक च्या धडकेत 5 प्रवासी जखमी झाले होते, दुसरी घटना सिंदेवाही येथे लग्नाची वरात घेऊन जात असताना ट्रॅव्हल्स चा मागील टायर फुटल्याने अपघात झाला, यामध्ये तब्बल 14 प्रवासी जखमी झाले.#khabarkatta chandrapur

सावली तालुक्यातील गेवरा येथून लग्नाचे कार्यक्रम आटपुन नागभीड़ तालुक्यातील नांदगांव येथे Travels ने जात असतांना पळसगाव (जाट) नजीकच्या नदीसमोर ट्रैवल्सचा मागील टायर फुटल्याने चालकाचे गाड़ीवरुन नियंत्रण सुटल्याने ट्रैवल्स रस्त्याच्या कडेला पलटली. सदर ट्रैवल्समध्ये अंदाजे 35 वराड़ी होते. #khabarkatta chandrapur

जखमीमध्ये वारलू कचरू मेश्राम (60), प्रभाकर गेडाम (52), शंकर ठाकरे (50), सदानंद ठाकरे (17), मयूर गुळ (21), आत्माराम निमगड़े (65), लोकनाथ डोंगरवार (52), भागवत गजभे (75), प्रकाश मेश्राम (55), ऋषिजी चांदेकर (45), श्रीधर चांदेकर (47), नागेश्वर चौके (24), प्रफुल दडमल (24), नितेश गज (11) सदर वराड़ी हे सावरगांव, नांदगांव, तुकुम वचिखलगाव येथील आहेत. अपघातग्रस्त नागरिकांना सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातग्रस्त स्थळ हे तळोधी पोलीस ठाणे अंतर्गत येत असल्याने पुढील तपास तळोधी पोलीस करीत आहे.

Pages