चंद्रपूर शहरापासून अंदाजे 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील बोर्डा वायगाव रोड वरील तामगाडगे फार्म हाऊस जवळ रोड पासून 200 मीटर अंतरावर जंगलात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला.#khabarkatta chandrapur
मृतकाचे वय अंदाजे 35 ते 40 वर्ष असून अंगावर कथ्या रंगाची ली कूपर लिहिलेली हाफ टी शर्ट, लाल रंगाचा हाफ पॅन्ट परिधान केलेला आहे, केस पूर्णपणे गळलेले (टक्कल) आहेत#khabarkatta chandrapur
मृतदेह अंदाजे मागील 3-4 दिवसांपासून पडलेला असावा कारण मृतदेह फुगलेल्या व किडे लागलेल्या अवस्थेत आहे.
सदर मृतक इसमाच्या वर्णनाचा कोणाचा नातलग हरवला असल्यास किंव्हा सदर मृतदेहाची ओळख पटल्यास रामनगर पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा असे आवाहन रामनगर पोलीस स्टेशन च्या वतीने करण्यात आले आहे.#khabarkatta chandrapur

