चंद्रपूरकरांच्या पोटात जात आहे बनावट दारू : शहरातील दारू कारखान्यावर छापा - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



चंद्रपूरकरांच्या पोटात जात आहे बनावट दारू : शहरातील दारू कारखान्यावर छापा

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यात आल्यावरही जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध दारू विक्री सुरूच असुन मागील काही काळापासून जिल्ह्यात अवैध नकली दारू निर्मिती सुरू असल्याच्या घटना उघडकीस येत आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या बनावट दारूमुळे मद्य शौकिनांच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नसून भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास ह्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील मुल तालुक्यात दोन वेगवेगळया ठिकाणी धाड घालून आबकारी (Excise Deaprtment) विभागाने मिथ्या प्रमाणात अवैध दारू निर्मिती कारखाने उध्वस्त केले होते. ह्या घटनेची शाई वाळते ना वाळते तर चक्क जिल्हा मुख्यालय असलेल्या चंद्रपूर शहरातील जलनगर परिसरातील कंजर मोहल्यात स्थानिक गुन्हे शाखेने धाड घालून भेसळयुक्त विदेशी मद्यसाठा तसेच भेसळ करण्याकरिता वापरण्यात येणारे विविध साहित्य जप्त केले आहे.#khabarkatta chandrapur 

कंजर मोहल्ल्यातील रवींद्र उर्फ बिट्टू कंजर हा मध्यप्रदेश मधील दारू महाराष्ट्रात आणून त्यात अमली व उग्रवासाचे पदार्थ मिसळवून नकली दारू बनवून ती रॉयल स्टॅग (Royal Stag) व ऑफिसर्स चॉईस (Officers Choice) च्या बाटल्यांमध्ये भरून भेसळ केलेली अवैध दारू विक्री केल्या जात असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त झाली. मिळालेल्या माहितीची शहानिशा करून स्थानिक गुन्हे शाखेने नकली भेसळयुक्त दारू निर्मिती कारखान्यावर छापा टाकला. छाप्याच्या वेळी स्थानिक गुन्हे शाखेला बिट्टू कंजर नामक व्यक्ती बनावटी दारू तयार करतांना आढळला मात्र धाड पडल्याचे लक्षात येताच आरोपी बिट्टू कंजर ह्याने पोलीसांना गुंगारा देऊन पळ काढलापोलिसांच्या झडतीत रॉयल स्टॅग डिलक्स व्हिस्कीच्या बाटल्यांचे तोडलेले बुच, 180 मिलीच्या रिकाम्या बाटल्या, बाटल्या सीलबंद करण्यासाठी बनावट झाकणे, बुच व बाटली सिल करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य, ऑफिसर्स चॉईस कंपनीच्या 90 मिली क्षमतेच्या रिकाम्या प्लॅस्टीक बाटल्या, मध्य प्रदेश शासनाचे कागदी लेबल असलेल्या या कंपनीच्या 90 मिली क्षमतेच्या विदेशी दारूने भरलेल्या एकूण 295 नग प्लॉस्टीक बॉटल, रॉयल स्टॅग कंपनीच्या जुन्या 180 मिली क्षमतेच्या बॉटलमध्ये बनावट भेसळ दारू भरून त्याला नविन झाकण व बुच लावून असलेल्या एकूण 36 बाटल्या, जुन्या बॉटलचे बूच तोडण्या करीता वापरण्यात येणारे एक कटर, बनावट दारू बॉटल मध्ये भरण्या करीता वापरण्यात येणारी एक प्लॉस्टीकचे नरसाळे, 5 लिटर क्षमतेच्या प्लॉस्टीकच्या दोन कॅन भरून भेसळ करण्याकरीता वापरण्यात येणारा उग्रवास येत असलेले पाण्यासारखे दिसणारे द्रव्य, एका 5 लिटरच्या कॅन मध्ये भेसळ केलेले लालसर उग्रवास येत असलेले द्रव्य असा एकुण 31925 /- रू. चा बनावट दारू बनविण्याकरीता वापरण्यात येणारा मुद्देमाल जप्त करण्यात आला.#khabarkatta chandrapur 

आरोपी रविंद्र उर्फ बिट्टु रणधीर कंजर, वय 25 वर्षे रा. कंजर मोहल्ला, जलनगर वार्ड चंद्रपूर विरूध्द पोलीस स्टेशन रामनगर अपराध क. 415 / 2023 कलम 420, 328 भादंवि सह कलम 65 (अ), 65 (ब), 65 (ड), 65 (ई), 65 (फ), 67. 67(1)(अ), 67 (क). 108 महाराष्ट्र दारूबंदी कायदा सहकलम 63 प्रतीलीपी अधिकार अधिनियम 1957 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन पसार झालेल्या आरोपीचा शोध सुरू असुन पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे.#khabarkatta chandrapur 

सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधिक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांचे नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक मंगेश भोयर, पोलीस अंमलदार संजय आतकूलवार, संतोष येलपुलवार, नितीन रायपुरे, रविंद्र पंधरे, कुंदनसिंग बावरी, गोपाल आतकुलवार, नरेश डाहुले, प्रांजल झिलपे, चंद्रशेखर आसुटकर यांनी केली.

Pages