वर्धा:शहरालगतच्या पुलफैल या झोपडपट्टी परिसरात घडलेली घटना दुर्दैवाची परिसीमाच ठरावी. गॅस सिलिंडर संपल्याने बाळू मसराम (27) चूल पेटवण्यास बसला. एकाएकी चुलीतून आगीचा भडका उडाला आणि झोपडीवजा घराने पेट घेतला. त्यात बाळू होरपळून निघाला. त्याचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने त्याची पत्नी व मुलगा घराबाहेर असल्याने ते वाचले.#khabarkatta chandrapur
Share This
About Kshitija

