भद्रावती शहरालगतच्या आयुध निर्माण चांदा येथील वसाहतीतील कम्युनिटी हॉल जवळील अय्यप्पा मंदिर मागील भागात वनविभागाने वेगवेगळ्या पाच ठिकाणी ठेवलेल्या पिंजऱ्यात सोमवार, 10 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास बिबट पिंजऱ्यात जेरबंद झाला. या घटनेची माहिती आयुध निर्मानी प्रशासनाने वन विभागाकडे दिली असता सदर बिबट्याला नर्सरीमध्ये ठेवण्यात आले आहे.#khabarkatta chandrapur
गेल्या काही दिवसांपासून पिपरबोडी व आयुध निर्माणीच्या वसाहतीत धुमाकूळ घालून पाच ते सहा जणांना बिबट्याने जखमी केले होते. या घटनेची माहिती आयुध निर्मानी प्रशासनाने वन विभागाकडे दिली असता वनविभागाने आयुध निर्माण वसाहतीच्या अयप्पा मंदिर,स्टेट बँक,हिरा हाऊस सह अन्य पाच परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावले होते.#khabarkatta chandrapur