खळबळजनक: रिकामी खोलीत इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला...#A decomposed body was found in an empty room - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



खळबळजनक: रिकामी खोलीत इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला...#A decomposed body was found in an empty room

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

सिंदेवाही : येथील राधीका वस्त्र भंडारच्या वरच्या रिकामी खोलीत इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. ही घटना शुक्रवारी (ता. 28) सायंकाळी 6.30 च्या सुमारास उघडकीस आली. विशषे म्हणजे काही मुले टीव्हीची केबल दुरुस्ती करण्यसाठी राधीका वस्त्र भंडार कपड्याच्या वरच्या खोलीमधुन मुलांना दुर्गंधी येत होती. त्यामुळे त्या मुलांनी तिथे असलेल्या रिकामी खोलीत जाऊन पाहिले असता त्यांना इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह दिसला.#khabarkatta chandrapur

सदर घटनेची माहिती तत्काळ चिमूर पोलीसांना देण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक तुषार चव्हान यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. सदर घटनेचा पंचनामा करण्यात आला. कुजलेल्या अवस्थेत असलेल्या इसमाचा प्रेत उत्तरीय तपासणीकरीता सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना कळताच नागरिकांची मोठी गर्दी झाली. घटनेचा पुढील तपास सिंदेवाही पोलीस करीत आहे.#khabarkatta chandrapur


Pages