खबरकट्टा/चंद्रपूर:
जिल्ह्यात सध्या मानव वन्यजीव संघर्षाच्या घटनेत वाढ होत असून आज सकाळी 45 वर्षीय पुरुषोत्तम बोपचे हा वाघाच्या हल्ल्यात ठार झाला.
चंद्रपुरातील पोलाद कारखाना मध्ये पुरुषोत्तम बोपचे रा. इंदिरानगर हा सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता, सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास कारखान्यासमोर असलेल्या हनुमान मंदिरात पूजा करण्यासाठी गेला असता पूजेसाठी बोपचे हा फुल तोडण्यासाठी लोहारा जंगल परिसरात गेला असता त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने पुरुषोत्तम वर हल्ला करीत ठार केले. दुपार झाल्यावर सुद्धा पुरुषोत्तम हा घरी परत न आल्याने घरच्यानी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तो कुठे ही न आढळून आल्याने मंदिर परिसराला लागून असलेल्या जंगलात बोपचे यांचा शोध घेतला असता तिथे त्यांचा मृतदेह आढळून आला.
याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली, वनविभागाच्या चमूने पंचनामा करीत मृतदेह कुटुंबीयांकडे सोपविण्यात आला.

