खबरकट्टा/चंद्रपूर:
डिझेल टँकर आणि कंटेनरची जोरदार धडक झाली यानंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला. सदर घटना 27 एप्रिल गुरुवार रोजी रात्रीच्या सुमारास भंडार पासून 6 किमी अंतरावर मुंबई, कोलकाता राष्ट्रीय महामार्ग वर ऐन पुलावर घडली. यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती. रात्री उशिरा आग fire विझविल्यानंतर मार्ग मोकळा करण्यात आला. मात्र दुतर्फा अडकलेल्या वाहनांना अनेक तास मोठ्याप्रमाणात वाहतुकीची समस्य कायम होती. दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. अनेक वाहने तासंतास अडकून पडल्याने वाहन चालकांना गैरसोयींचा सामना करावा लागला. भंडारा- नागपूर आणि भंडारा - लाखनी दरम्यान दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडीची समस्या जाणवली. याचा सर्वाधिक फटका उपचारासाठी जाणाऱ्यांना बसला.#khabarkatta chandrapur
रात्री अंदाजे 8 च्या दरम्यान दोन्ही वाहनांमध्ये धडक झाल्यानंतर टँकरने पेट घेतला. यात कंटेनर मधील 1 जण अडकून पडल्याने त्याचा आगीत जळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आहे. तब्बल 2 तासानंतर 2 अग्नीशामक वाहन च्या माध्यमातून ही आग विझवण्यात यश आले. त्यानंतर वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करण्यात आला. मात्र तोपर्यंत दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या राष्ट्रीय महामार्गावर भिलेवाडा ते पलाडी दरम्यान महामार्गाचे काम सुरू आहे. त्यातच अरूंद पुलावरील मार्गावरून वाहतूक सुरू आहे. दुहेरी वाहतुकीचा मार्ग नसल्याने वाहतुकीला प्रचंड अडथळा होत आहे. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी दुपारपर्यंत सुद्धा वाहतुकीची समस्या कायम होती.#khabarkatta chandrapur

