खबरकट्टा/चंद्रपूर :
शहरातील बस स्टँड जवळील पुलावर अडवून बळजबरीने पैसे, मोबाईल हिसकवणाऱ्या टोळीला रामनगर गुन्हे अन्वेषण पथकाने अवघ्या काही तासातच अटक केली. यात 3 युवक व एक महिला आरोपी आहे त्यांचेकडून एकूण 54300 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
जयदीप दवणे नामक व्यक्ती दिनांक 26 एप्रिल रोजी सकाळी आपल्या भावाच्या लग्नाच्या पत्रिका वाटपास अकोला गेले, रात्रो 10:30 वाजता परत येताना चंद्रपूर येथील पाण्याचे टाकी जवळ उतरले तिथून बस स्थानकाकडे पायदळ जात असताना बस स्टॉप चौकात मागून कथ्या रंगाच्या ज्युपिटर मोपेड वर अज्ञात तीन इसम व एक महिला आले व रस्ता अडवून गाडीवर बस म्हणत जबरदस्ती पकडून खिशातील रोख रक्कम 8000 रुपये, मोबाईल ची पॉवर बँक व मोबाईल चार्जिंग केबल हिसकावून पळून गेल्याची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात दाखल केली.#khabarkatta chandrapur
रामनगर पोलीस ठाण्यात 436/2023 कलम 392, 341, 506, 34 भांदवि अन्वये गुन्हा नोंद करून गुन्ह्याचा तपास सुरू केला.
रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे पोऊनी विनोद भुरले व पथक यांनी तपासाची चक्रे फिरवीत अवघ्या काही तासातच आरोपी विजय उर्फ पप्पू मनीष शेट्टी वय 19 वर्ष, शुभम सुधाकर रामटेके वय 25 वर्ष दोघेही राहणार शामनगर, चंद्रपूर, दिपक राजू भोले वय 19 वर्ष रा. शांतीनगर, बंगाली कॅम्प, चंद्रपूर व एक महिला आरोपीला अटक करण्यात आली.#khabarkatta chandrapur
आरोपींकडून 3200 रुपये, मोबाईल पॉवर बँक, डेटा केबल व गुन्हयात वापरलेली ज्युपिटर मोपेड दुचाकी वाहन असा एकूण 54300 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.#khabarkatta chandrapur
सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक, चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक, चंद्रपुर, उपविभागिय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांचे मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस, निरीक्षक राजेश मुळे, मपोनि लता वाढीवे, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि मधुकर सामलवार, पो. हवा. रजनीकांत पुट्ठावार, प्रशांत शेंदरे, विनोद यादव, किशारे वैरागडे, चिकाटे, मिलींद दोडके, आनंद खरात, निलेश मुडे, सतिश अवथरे, लालु यादव, विकास जुमनाके, हिरालाल गुप्ता, संदिप कामडी, विकास जाधव तसेच भावना रामटेके यांनी केली.

