शरद पवारांकडून राज्यात नेतृत्वबदलाचे संकेत...#Sharad Pawar hints at change of leadership in the state - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



शरद पवारांकडून राज्यात नेतृत्वबदलाचे संकेत...#Sharad Pawar hints at change of leadership in the state

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तरुणांना योग्य ती संधी देऊन एक नवीन नेतृत्व तयार केले जाईल, भाकरी ही फिरवावी लागते, ती फिरवली नाही तर करपते, ती भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे, आता विलंब करून चालणार नाही" असे वक्तव्य करून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षात मोठ्या फेरबदलाचे व नेतृत्वबदलाचे स्पष्ट संकेत दिले आहे.

मुंबई विभागीय राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या युवा मंथन कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. शरद पवार यांनी पक्षात राज्य पातळीवरील बदलाचे संकेत दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. समाजात काही व्यक्तींना पद असो अथवा नसो कार्यकर्त्यांमध्ये सन्मान असतो. तो सन्मान प्राप्त करण्यासाठी तुम्हाला पुढील पायरीवर जाण्याची तयारी ठेवली पाहिजे, असेही शरद पवार म्हणाले." मी पक्षाचे प्रांताध्यक्ष इतर नेते आणि मुंबईचे कार्याध्यक्ष यांच्याशी चर्चा करून त्यांना सांगणार आहे की, जे लोक संघटनेत मागील 7, 8 वर्षे एकाच पदावर काम करत आहे, त्यात बदल करावा, युवकांना संघटनेत घ्यावे, त्यातून त्यांना कामाची संधी द्यावी, या कामातून जो आपले स्थान प्रस्थापित करेल त्याला महानगरपालिकेत संधी द्यावी" असेही पवार म्हणाले.#khabarkatta chandrapur

Pages