शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत शंभर क्विंटल कापूस जळून खाक...#A hundred quintals of cotton were burnt in a fire caused by a short circuit - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत शंभर क्विंटल कापूस जळून खाक...#A hundred quintals of cotton were burnt in a fire caused by a short circuit

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर: :

कोरपना – वणी राज्य महामार्गावरील कोरपना जवळील हेटी येथील जय सरस्वती जिनींग येथे शॉर्टसर्किटमुळे कापसाच्या गंजीला शुक्रवार 28 एप्रिल रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास भीषण आग लागली.

प्राप्त माहितीनुसार, पहाटे अचानक शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत जवळपास शंभर क्विंटल कापूस जळून खाक .झाला. त्याची अंदाजे किंमत सात लाख रुपये वर्तविण्यात येत आहे. आगीची घटना घडताच कोरपना नगर पंचायतचे अग्निशमन वाहन पाचारण करून आग नियंत्रणात आणली. घटनेचा पुढील तपास कोरपना पोलीस करीत आहे.

Pages