महाविद्यालयीन शिक्षकांना 1 मे ते 15 जून 2023 पर्यंत उन्हाळी सुट्ट्या द्या: गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स ची मागणी - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



महाविद्यालयीन शिक्षकांना 1 मे ते 15 जून 2023 पर्यंत उन्हाळी सुट्ट्या द्या: गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स ची मागणी

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

राजुरा-गोंडवाना विद्यापीठातील सत्र 2022- 23 च्या अकॅडमीक कॅलेंडर नुसार महाविद्यालयांना उन्हाळी सुट्ट्या 1 जून 2023 ते 30 जून 2023 पर्यंत घोषित केलेल्या होत्या मात्र त्यानंतर पत्र क्र.गो वी 2895/2023 नुसार शैक्षणिक वेळापत्रकात बदल करून विद्यापीठातील सर्व संलग्नित महाविद्यालयांना 1 मे 2023 पासून होणार सुट्ट्या जाहीर केलेल्या आहेत. विद्यापीठाच्या वेळोवेळी बदलल्या जाणाऱ्या शैक्षणिक वेळापत्रकामुळे महाविद्यालयांना सत्र 2023 -24 चे शैक्षणिक वेळापत्रक तयार करताना अडचण निर्माण होत आहे

या पार्श्वभूमीवर गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स ने संलग्नित महाविद्यालयातील प्राध्यापकांना 1मे ते 15 जून 2023 पर्यंत उन्हाळी सुट्ट्या द्याव्यात अशी मागणी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांच्याकडे केलेली आहे.#khabarkatta chandrapur

विशेष करून महाविद्यालयीन शिक्षकांना कोणत्याही अर्जित रजा नसतात तसेच शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे महिन्याच्या कोणत्याही शनिवारी देखील सुट्टी नसते.या पार्श्वभूमीवर त्यांना कुटुंबासोबत वेळ घालवण्याकरता उन्हाळी अवकाश काळ व हिवाळी अवकाश यावरच अवलंबून राहावे लागते. या कालावधीत महाविद्यालयीन शिक्षक वर्ग हे विद्यापीठाचे पेपर मूल्यांकन व परीक्षा संबंधी सर्व कामे जबाबदारीने पार पडत असतात. व उरलेला वेळ हा आपल्या कुटुंबासोबत घालण्याच्या व स्व:गावी जाण्याच्या दृष्टीने उन्हाळी अवकाशाचा काळ महत्त्वाचा ठरतो. अशा परिस्थितीत विद्यापीठाद्वारे वारंवार केल्या जाणाऱ्या शैक्षणिक वेळापत्रकामध्ये बदलामुळे त्यांच्या नियोजनावर विपरीत परिणाम होत आहे.#khabarkatta chandrapur

या पार्श्वभूमीवर गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशन ने महाविद्यालयीन शिक्षकांना 1 मे ते 15 जून 2023 पर्यंत सुट्ट्या घोषित कराव्या अशी मागणी करण्यात आलेली आहे या संबंधाचे निवेदन गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय गोरे व सचिव डॉ.विवेक गोर्लावार यांनी संघटनेच्या वतीने या. कुलगुरूं व मा. प्र-कुलगुरू गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांना दिले आहे..#khabarkatta chandrapur

Pages