चिमुर तालुक्यातील नेरी येथून जवळच असलेल्या मोटेगाव येथील पंचशील ध्वजाची व पंचशिल तोरणाची विटंबना करण्यात आल्याने सामाजिक वातावरण तापले होते
पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कळते की मोटेगाव येथील बसस्टापवरील संवीधान चौकात मोटेगाव बौद्ध पंचकमेटीचे श्रद्धा स्थान तिथे आहे पंचशिल ध्वज असुन या ठिकाणी मोटेगाव येथील बौद्ध बांधव बुद्ध जयंती ,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बौद्धांची सर्व कार्यक्रम या स्थळी बौद्ध लोक गोळा होवून साजरी करतात.#khabarkatta chandrapur
14 एप्रिल ला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म दिवस भारतात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे येथील बौद्ध बांधव सुद्धा 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी जय्यत तयारीने कामाला लागले होते बौद्ध बांधवांनी त्या ठिकाणी पंचशील ध्वज लावुन पंचशील पताका लावण्यात आले होते.#khabarkatta chandrapur
सदरील 13 एप्रीलला पंचशील ध्वज व पंचशिल तोरण फारेस्टच्या पोलला लावलेले गावातील एका माजी पो.पाटील गणेश दादाजी सुकारे व संतोष नामदेव कामडी यांनी काढून शुभम प्रमोद मसराम या मुलांच्या मदतीने काढून टाकले व बौध्द विहाराच्या पटांगणात नेऊन फेकले . ही एक नींदणीय बाब लक्षात येताच बौद्ध बांधवांना कळताच गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.#khabarkatta chandrapur
याविषयी पोलीस स्टेशन चिमुरला प्रकरण कळताच ठाणेदार मनोज गभने यांनी घटनास्थळी आपल्या ताफ्यासहीत धाव घेवून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती संपूर्ण गावात महामानव व संविधानाचे शिल्पकार यांची जयंती उत्साहात साजरी करा असे ठाणेदार यांनी गावकऱ्यांना सांगितले.#khabarkatta chandrapur
या प्रकरणी बौध्द पंचकमेटीचे मोटेगांवचे अध्यक्ष राष्ट्रपाल गेडाम यांच्या तक्रारीवरून यातिघांवर भारतीय दंडसंहीता 1860 नुसार कलम 294 , 295 (A) 34 , अनुसुचित जाती आणि अनुसूचित जमाती ( अत्याचार प्रतीबंधक ) अधीनीयम 1989 नुसार 3(1)(r),(3)(1)(s)नुसार गुन्हे नोंद करण्यात आले . पुढील तपास उपावीभागीय पोलीस अधीकारी आयुष नोपाणी यांच्या अधीकाराखाली सुरू आहे .
दीनांक 16 एप्रीलला मोटेगांवचे बौध्द पंचकमेटीचे अध्यक्ष राष्ट्रपाल गेडाम व पंचकमेटी यांनी पञकार परीषद घेउन आरोपीवर कडक कारवाई करून अटक करण्याची मागणी केली आहे . अजुनही आरोपी मोकाटच फीरत आहेत . त्यामुळे कारवाई थंडबस्त्यात तर नाही ना अशी शंका मोटेगांव येथील बौध्द बांधवाना पडला आहे . त्यामुळे पञकार परीषद घेउन न्याय मीळवुन देण्याची मागणी येथील बौध्द बांधवानी केली आहे.#khabarkatta chandrapur
या पञकार परीषदेवेळी बौध्द पंचकमेटीचे अध्यक्ष राष्ट्रपाल गेडाम , बौध्द पंचकमेटी , दीपक दुधे ,अॅड मीलींद मेश्राम , धनपाल खोब्रागडे , चंदु रामटेके , सुशीला खोब्रागडे , वैशाली खोब्रागडे , नेहा गजभीये, वीद्या पाटील , लता गेडाम , नीलम रामटेके , पुष्पा शेडें , आशा रामटेके , प्रेमीला खोब्रागडे व अन्य बौध्द बांधव उपस्थीत होते .

