प्रेयसीची हौस पूर्ण करण्यासाठी प्रियकर बनला चोर...#The lover became a thief to fulfill the desire of the beloved - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



प्रेयसीची हौस पूर्ण करण्यासाठी प्रियकर बनला चोर...#The lover became a thief to fulfill the desire of the beloved

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

नागपूर: प्रेयसी वारंवार पार्टी मागते तसेच नवीन कपड्याची तिची हौस पूर्ण करता यावी, यासाठी प्रियकराने चोरी करण्याचा मार्ग पत्करला. त्या युवकाने मित्राच्या मदतीने बेलतरोडीतील धनाढ्य असलेल्या एका वृद्धेला घरात जाऊन लुटमार केली होती. या दोन्ही चोरट्यांना पोलीस उपायुक्तांच्या सायबर झोन पथकाच्या मदतीने अटक करण्यात आली. अर्पित रत्नाकर पोटे (22, दर्शन कॉलनी, नंदनवन) आणि धनंजय उर्फ राहुल भास्कर बारापात्रे (23, पंडितनगर, रमणा मारुती) अशी आरोपींची नावे आहेत. अर्पितने प्रेयसीला पार्टी देण्यासाठी 40 हजारांचे कर्ज घेतले होते व पैसे जमा करण्यासाठी त्याने धनंजयच्या मदतीने हे पाऊल उचलले.#khabarkatta chandrapur

67 वर्षीय सुधा कृष्णकुमार गहरवार या बेलतरोडी येथील नरेंद्रनगर येथे राहतात. त्यांचे पती बँकेत कायदेविषयक सल्लागार आहेत. मुलगा आणि मुलगी अमेरिकेत डॉक्टर आहेत. 13 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता सुधा या घरी असताना चेहऱ्याला काळा कपडा बांधून दोन तरुण घरात आले. एकाने ‘काका आहेत काय’ असे विचारले. सुधा यांनी ‘आधी शूज बाहेर काढ’ असे म्हणताच तो तरुण बाहेर गेला व सहकाऱ्यासह परतला. त्याने सुधा यांच्या गळ्यावर चाकू ठेवला व जीवे मारण्याची धमकी देऊन आतील खोलीत नेले. तेथे रोख रक्कम किंवा मौल्यवान वस्तू न मिळाल्याने त्यांनी सुधा यांच्या गळ्यातील साखळी व आयपॅड हिसकावून पळ काढला.#khabarkatta chandrapur

सीसीटीव्हीच्या तपासातून पोलिसांना आरोपींचा सुगावा लागला. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी हे महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. अर्पित ऑनलाइन फूड डिलिव्हरीचे काम करतो आणि धनंजय कार वॉशिंगचे काम करतो. अर्पितने 31 डिसेंबरला त्याच्या प्रेयसीला पबमध्ये पार्टी दिली होती. त्यासाठी त्याने लोकांकडून पैसे घेतले होते. त्याच्यावर 40 हजार रुपयांचे कर्ज होते. तो पैसे परत करू शकला नाही. त्याने धनंजयला ही समस्या सांगितली. धनंजय हा गहरवार दाम्पत्याच्या घरी गाडी धुण्यासाठी येत असे. दोघेही एकटेच राहत असल्याचे त्याला समजले. सुधा दुपारी एकट्याच असतात हे त्याला माहीत होते. पोलिसांनी आरोपींकडून दुचाकी जप्त केली आहे. पोलीस निरीक्षक वैजयंती मांडवघरे, प्रशांत सोनुलकर, मंगेश देशमुख, विवेक श्रीपाद, वर्षा चंदनखेडे, दीपक तऱ्हेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.#khabarkatta chandrapur


Pages