नांदाफाटा ग्रामपंचायत नांदा च्या वतीने नुकतीच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले स्थानिक श्री शिवाजी इंग्लिश स्कूल तथा जुनियर कॉलेज इथून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक नांदा पर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले यावेळी महिलांनी विविध पारंपारिक वेशभूषा करून रॅलीमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला ढोल ताशाच्या गजरात रॅलीचे आयोजन करण्यात आले
खास महिलांसाठी आयोजित उमंग 2023 या सांस्कृतिक कार्यक्रमात महिलांनी एकलनुत्य समूहनृत्य उखाणे स्पर्धेत सभा घेऊन रसिकांची मने जिंकली एकलनुत्य स्पर्धेत प्रथम सृष्टी पेंदोर द्वितीय श्रेयांश कोटनाके तृतीय हितांशी नवले समूह नुत्य स्पर्धेत प्रथम शांती कॉलनी ग्रुप द्वितीय बडोले ग्रुप तृतीय विना ग्रुप यांना पारितोषिक देण्यात आली उखाणे स्पर्धेत प्रथम प्रियल तुरकर द्वितीय साधना मळावी तृतीया अनिता वैरागडे यांना पारितोषिक मिळाली तृतीया बक्षीस वितरण कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून सरपंच मेघा पेंदोर प्रमुख उद्घाटक म्हणून गावच्या पोलीस पाटील वैशाली भोयरपाहुणे प्रमुख प्राचार्य अलेक्झांडरीना डिसूजा प्राचार्य अरुणा चव्हाण सहसंयोजिका नम्रता गुंडावार आवरपूरचे सरपंच प्रियंका दिवे नांदा महिला ग्रामपंचायत सदस्य आधी प्रामुख्याने उपस्थित होते
यावेळी कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविका आशासेविका बचत गटातील महिला यांचा यावेळी सन्मानही करण्यात आला सोबतच नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य सुषमा गेडाम सुनिता आत्राम जयश्री ताकसांडे मंगला गायकवाड सुजाता चौधरी संगीता धोणे आशा खासरे अश्विनी मडावी आदींचा सत्कार करण्यात आला .कार्यक्रमाचे संचालन मीना तितरे यांनी केले प्रास्तविक निशा चटप यांनी तर आभार संगीता बलकी यांनी केले स्पर्धेचे परीक्षण मनीषा भट्टड व निशा गुप्ता यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजनासाठी ग्रामपंचायत नांदा व गावातील महिला मंडळींनी परिश्रम घेतले यावेळी गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या