खबरकट्टा/चंद्रपुर :
जागतिक महिला दिनी चंद्रपुरात एका महिलेने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. तिने इन्स्टाग्राम वर स्वतःचा फोटो शेअर करत, माझा शेवटचा फोटो, असं म्हणत तिने गळफास घेत आत्महत्या केली.
मृतक मुलीचे नाव गायत्री रामटेके (20) असे असून ती भंडारा जिल्ह्यातील करांडला या गावतील आहे, ती चंद्रपुरातील घुटकाला वार्डात स्पर्धापरीक्षेच्या तयारी साठी किरायाने रहात होती, याच किरायच्या घरातच तिने गळफास घेत जीवन संपवलं.
या घटनेने परिसरात दुःख व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट सापडली आहे.'
आई वडील नसल्याने मी हतबल झाले आहे' असं त्यात लिहिलं होतं अशी माहिती पोलीस विभागाने दिली.
पुढील तपास शहर पोलीस करत आहेत.