आधुनिक तंत्राच्या साहाय्याने बंद रेती घाटातून वाळुचा उपसा जोमात...#With the help of modern technology, sand extraction from closed sand wharf is being carried out vigorously - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



आधुनिक तंत्राच्या साहाय्याने बंद रेती घाटातून वाळुचा उपसा जोमात...#With the help of modern technology, sand extraction from closed sand wharf is being carried out vigorously

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी तालुक्यातील हळदा, रणमोचण, आवळगाव, बोढेगाव, सोंन्द्री, खरकाडा, बोळधा या रेती घाटाचे नियमानुसार लिलाव झाले आहे.पण 28 फरवरी ला पर्यावरण विभागाने रेती घाटावर बंदी घातली. त्यानंतर नदी पात्रातून कुठल्याही रेती घाट मालकाला रेती उपसा करण्याचा अधिकार नाही व तसा परवाना सुध्दा नाही. तरी पण ब्रम्हपुरी तालुक्यातील या सर्व बंद वाळू घाटातून मोठ्या प्रमाणावर आधुनिक तंत्राच्या साहाय्याने उपसा सुरू आहे.#khabarkatta

तालुक्यातील महसूल व पोलीस हे दोन्ही यंत्रणा सध्या मुंग गिळून गप्प बसल्याचे चित्र बघायला मिळत आहे. ब्रम्हपुरी तालुक्यातील महसूल अधिकारी व रेत तस्करांमधील दुवा म्हणून के. बी नावाचा दलाल तालुक्यात सक्रिय आहे. ब्रम्हपुरी तालुक्यात के. बी नावाच्या दलालांच्या माध्यमातून शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडवून शासनाला चुना लावत असल्याचे चित्र आहे. के. बी. नावाच्या या दलालाने काही वर्षात कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमा केली आहे. के. बी नावाचा दलाल हा रेती तस्करांकडुन ऍन्ट्री च्या नावाखाली लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याची माहिती मिळत आहे. ब्रम्हपुरी तालुक्यातील अधिकारी व के. बी नावाचा दलाल यांच्या सक्रिय संबधाने मोठ्या प्रमाणावर घाटातून वाळुचा उपसा सुरू आहे. याकडे चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व महसूल मंत्री राधाकृष्णन विखे पाटील यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.#chandrapur

Pages