अपघातग्रस्त महिलेला दिवाकर निकूरे यांची आर्थिक मदत...#Financial help of Diwakar Nikure to accident victim - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



अपघातग्रस्त महिलेला दिवाकर निकूरे यांची आर्थिक मदत...#Financial help of Diwakar Nikure to accident victim

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

चिमूर:रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेला दुचाकीने धडक दिल्याची घटना येथील खरबी टोल नाक्याजवळ दि.17 ला सायंकाळी घडली होती. अपघातात दिपाली दिवाकर बावनथडे (42) रा. खरबी ही महिला गंभीर जखमी झाली होती. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग ग्रामीण चंद्रपूर जिल्हाध्यक्ष दिवाकर नीकुरे यांनी रुग्णाच्या मदतीला धाऊन माणुसकीचे दर्शन घडविले.#khabar katta chandrapur 

ब्रम्हपुरी नगभिड रोडवरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय समोर रस्त्याचे कडेला दिपाली बावनथडे यांचे छोटेसे चाय चे दुकान आहे.घटनेच्या दिवशी दिपाली या दुकानावरून जवडच असलेल्या खरबी येथे घरी पायी परत जात असताना एका भरधाव वेगाने असलेल्या दुचाकीने जोरदार धडक दिली.या अपघातात दिपाली यांचे डोक्याला जबर दुखापत झाली.त्यांना लगेच ब्रम्हपुरी तील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मेंदूला मार असल्याने मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली. उपचारासाठी मोठा खर्च असल्याने त्यांच्या पतीने मदत मिळावी म्हणून अनेकांना विनंती केली. सदर घटनेची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग ग्रामीण चंद्रपूर जिल्हाध्यक्ष दिवाकर नीकुरे यांना होताच त्यांनी रुग्णालयात भेट देऊन रुग्णाला आर्थिक मदत दिली.#chimur

Pages