खबरकट्टा/चंद्रपूर:
वरोरा हायवे वर विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या ट्रक क्रमांक MH- 34- BZ- 2996 ने समोरासमोर कारला जबर धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, कार तब्बल अर्धा किलोमीटर ट्रक ने खेचत नेली. या घटनेत डॉ. अश्विनीचा घटनास्थळीच मृत्यू झाला
तर गंभीर जखमी असल्याने डॉ. अतुल यांना उपचारार्थ हलविण्यात आले. चंद्रपूर ला नेत असताना भद्रावती जवळ डॉ. अतुल यांचा मृत्यू झाला.#khabarkatta
भरधाव ट्रकने वणीकडे येत असलेल्या कारला धडक दिल्याने डॉक्टर दांपत्यांचा मृत्यू झाला. डॉ. अश्विनी गौरकार- झाडे (31) व डॉ. अतुल गौरकार (34) असे मृतक दाम्पत्याचे नाव आहे.
ही घटना वरोरा-भद्रावतीजवळ घडली. ते दोघे आपल्या चिमुकल्या बाळाला घरी आई वडीलाजवळ ठेवून वरोरा येथे स्वतःच्या चारचाकी वाहन क्रमांक MH-34- AM- 4240 ने वरोरा येथे गेले होते.#chandrapur