पेन्शन मागणे हा आपला संवीधानीक अधीकार - सतीशभाउ वारजुकर...#Asking for pension is our constitutional right - Satishbhau Warjukar - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



पेन्शन मागणे हा आपला संवीधानीक अधीकार - सतीशभाउ वारजुकर...#Asking for pension is our constitutional right - Satishbhau Warjukar

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

राज्य कर्मचाऱ्यांचा 14 मार्चपासुन राज्यव्यापी बेमूदत संप सुरू आहे . सगळे शासकीय कार्यालय तसेच शाळा , कॉलेज ओस पडलेले आहे .पाच तालुक्यातील बेमूदत सुरू असलेल्या संप स्थळाला डॉ. सतीशभाऊ वारजूकर यांनी भेट दीली . #khabarkatta 

या एकच पेन्शन .. जुनी पेन्शन या मागणीला सतीशभाउ वारजुकर यांनी आपला पाठींबा दर्शवीला आहे .या संपकरी राज्य कर्मचाऱ्याना मार्गदर्शन करते वेळी सतीशभाउ वारजुकर यांनी म्हटले की ,

2005 पासुन सरकारनी पेन्शन बंद केली .पेन्शन मागणे हा आपला संवीधानीक अधीकार आहे . आपल्या महाराष्ट्राच्या वीधानसभेत 174 आमदाराच बहुमत आहे . 6 दीवसापासुन राज्यव्यापी अधीकाऱ्यांचा जुनी पेन्शनसाठी बेमूदत संप सुरू आहे . पण अजून पर्यंत शींदे सरकारनी दखल घेतली नाही . हा देश डॉ.बाबाबासाहेब आंबेडकरांनी दीलेल्या संवीधानावर चालत आहे . सध्या देश हुकूमशाही कडे जात असतानी दीसत आहे . एसी .एसटीचे आरक्षण संपवण्याचा प्रयत्न या सरकारकडुन होत आहे . बेरोजगारांना रोजगार तर द्याच पण त्यासोबत जुनी पेन्शन ची मागणी सुध्दा रास्त आहे . पण हे हल्लीचे सरकार झोपेच सोंग घेऊन आहे .#chandrapur

आपल्या मागण्या रास्त आहे . लोकशाही आपल्या देशात टीकवीण्यासाठी आपण संवीधानीक मार्गाचा अवलंब केला पाहिजे .या चिमूर , नागभीड , सीदेंवाही , ब्रम्हपुरी , सावली , या ठीकाणी चालु असलेल्या राज्यव्यापी बेमूदत संपाला सतीशभाउ वारजुकर , चिमूर वीधानसभा क्षेञाचे काँग्रेसचे समन्वयक माजी अध्यक्ष जी.प .चंद्रपुर यांनी आपला पाठींबा दर्शवीला आहे .#old pension 

Pages