खबरकट्टा/चंद्रपूर:
उपराजधानीसह विदर्भात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे सावट असून हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, सोमवार 13 मार्चपासून 15 मार्चपर्यंत ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. उन्हाळ्याची चाहूल लागली असतानाच अवकाळी पावसाचे आगमन म्हणजे आजाराला आमंत्रण आहे.#khabarkatta
13 ते 15 मार्च या तीन दिवसांत आकाशात ढगांची गर्दी राहणार असून, तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस हाेण्याचा अंदाज आहे. 14 व 15 मार्चला पावसाची शक्यता अधिक आहे. नागपूर शहरातदेखील 16 मार्चला पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. प्रत्यक्षात पावसापेक्षा बिघडलेल्या वातावरणाचे काहूरच अधिक जाणवेल. बदलत्या वातावरणामुळे दिवस आणि रात्रीच्या तापमानात घट होण्याची शक्यता आहे. मात्र, अवकाळी पावसाचे सावट दूर झाल्यानंतर उकाड्यात चांगलीच वाढ होणार आहे.
