खबरकट्टा/चंद्रपूर:
जिल्ह्यातून होणारी अवैध रेती वाहतूक नागपुरात आणण्यासाठी ट्रक चालकांना चांगलीच कसरत करावी लागते. काम्पा ते भिसी या मार्गावर सुपर एन्ट्री असल्याने ट्रक चालक व मोटार मालकही बिनधास्त असतात. पण उमरेड ते नागपूर दरम्यानच्या रस्त्यावर प्रशासन झोपी गेल्यावर भरधाव रेतीची वाहतूक करतात. या रेतीचोरीतून कोट्यवधी रुपयांचा सरकारचा महसूल बुडत आहे आणि अधिकाऱ्यांचे खिसे गरम होत आहेत.#khabarkatta
नागपूर, भंडारा जिल्ह्यातील रेतीघाट बंद असल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील रेतीघाटावरून रेती उचलली जात आहे. रेतीच्या या व्यवसायात रॉयल्टी ही केवळ नावाचीच राहिली आहे. फक्त रेतीची चोरी होत आहे. टिप्परच्या क्षमतेच्यावर रेतीची वाहतूक सुरू आहे. या चोरीला एसडीओ कार्यालय, तहसीलदार कार्यालय, पोलिस निरीक्षक कार्यालय, आरटीओ, वाहतूक पोलिस, कुही फाटा चौकी अशा सर्वांचे पाठबळ मिळत आहे. या सर्वांचे एन्ट्री रेटही प्रति गाडी, प्रति महिना 10 हजार रुपये ठरलेले आहेत.#nagpur - chandrapur