चंद्रपूर जिल्ह्यातील तीन कंपन्यात निधी गुंतवण्यापासून सावध...#Three companies in Chandrapur district cautioned against investing funds - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



चंद्रपूर जिल्ह्यातील तीन कंपन्यात निधी गुंतवण्यापासून सावध...#Three companies in Chandrapur district cautioned against investing funds

Share This
खबरकट्टा चंद्रपूर :

केंद्रीय कार्पोरेट व्यवहार मंत्रालयाने चंद्रपुरातील येहोवा यीरे बचत निधी लि. चंद्रपूर, संपदा अर्बन निधी लि. मूल व लोढिया गोल्ड निधा लि. ब्रह्मपुरी या तीन कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.#khabarkatta

चंद्रपूर जिल्ह्यातील काही कॉर्पोरेट निधी कंपन्यांनी no किंवा परस्पर लाभ संस्थांनी कंपनी कायदा 2013 कलम 403 नुसार व त्याखालील नियमानुसार एनडीएच-4 अर्ज कार्पोरेट व्यवहार मंत्रालयात दाखल केले नाहीत. तसेच या अनधिकृत निधी कंपन्यांनी एनडीएच-4 अर्ज दाखल केले आहे परंतु, त्यांचे एनडीएच-4 अर्ज केंद्र शासनाच्या कार्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडून स्वीकारण्यात आलेले नाही, अशा अनधिकृत निधी कंपन्यांमध्ये नागरिकांनी निधी गुंतवू नये तसेच निधी गुंतवण्यापासून सावध राहण्याचे निर्देश केंद्र शासनाच्या कार्पोरेट व्यवहार मंत्रालयाने दिले आहे.#chandrapur

केंद्र सरकारच्या पाहणीत यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील येहोवा यीरे बचत निधी लि. चंद्रपूर, संपदा अर्बन निधी लि. मूल व लोढिया गोल्ड निधा लि. ब्रह्मपुरी या निधी कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांना कामकाज सुरू ठेवण्यापासून तसेच सदस्यांकडून निधी स्वीकारण्यापासून किंवा सर्वसाधारण जनतेला या कंपन्यांचे सदस्य होण्यापासून प्रतिबंधित केले आहे. याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Pages