लग्न ठरवण्यासाठी घरी पाहुणे आले अन् मुलीने कॉलेजमध्ये...#The house guests came and the girls in the college to decide marriage - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



लग्न ठरवण्यासाठी घरी पाहुणे आले अन् मुलीने कॉलेजमध्ये...#The house guests came and the girls in the college to decide marriage

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

नागपूर : लग्न ठरवण्यासाठी घरी पाहुणे आल्यामुळे भीतीपोटी मुलीने धंतोलीतील आनंद टॉकिजजवळ असलेल्या महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील वर्गातच विष प्राशन करून आत्महत्या केली. रिया (काल्पनिक नाव, वय 23, मानेवाडा) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.#khabarkatta

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिया ही महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत होती. ती सोमवारी (६ मार्च) रोजी सकाळी अकरा वाजता औद्योगिक संस्थेत आली होती. तिच्या आईवडिलांनी तिचे लग्न ठरवण्याचा विचार केला होता. परंतु, रियाला लग्न करायचे नव्हते. तिला शिक्षण पूर्ण करून नोकरी करायची होती. मात्र, आईवडील तिच्या लग्नासाठी प्रयत्न करीत होते. 6 मार्चलासुद्धा मुलाकडील पाहुणे घरी आले होते. त्यामुळे रियाला आईने फोन करून घरी बोलावले होते. मात्र, रियाने घरी येण्यास नकार दिला. तिचे कुण्यातरी युवकाशी प्रेमसंबंध होते. त्या युवकाशी तिला लग्न करायचे असल्यामुळे ती लग्नाला नकार देत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.#nagpur

6 मार्चला रियाने वर्गातच कीटकनाशक प्राशन केले. त्यामुळे ती बेशुद्ध पडली. अन्य विद्यार्थ्यांनी रियाला लता मंगेशकर रुग्णालयात दाखल केले. तिचा उपचारादरम्यान 11 मार्चला सकाळी साडेअकरा वाजता मृत्यू झाला. धंतोलीचे हवालदार क्रिष्णा, उपनिरीक्षक शेख यांनी या प्रकरणात काहीही सांगण्यास नकार दिला.#chandrapur

Pages