खबरकट्टा/चंद्रपूर:
एकाच दिवशी भंडारा, अकोला, चंद्रपूर आणि सोलापूर विभागामध्ये वेगवेगळ्या 13 ठिकाणी थकीत खातेदारांसाठी विशेष कर्ज मुक्ती मेळावे आयोजित करून विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. यावेळी भंडारा व तुमसर शाखांतर्गत एकूण 78 थकीत कर्जदारांनी भेटी दिल्या. त्यातील 32 थकीत कर्जदारांनी बँकेच्या विशेष सूट योजनेचा लाभ घेऊन 1 कोटी इतक्या कर्ज रकमेतून मुक्तता मिळविली.#khabarkatta
बँकेकडून कर्ज प्राप्त केल्यावर परतफेडीचे वचन दिल्याप्रमाणेच कर्जाची परतफेड होते असे नाही. काही प्रकरणांत अकल्पित अश्या बाबी घडत असतात. ज्यामुळे कर्जदाराला इच्छा असूनही परतफेड करणे जमत नाही. त्यातच मागील तीन वर्षात कोरोनाच्या संकटामुळे सुद्धा कर्जफेडीत मोठा व्यत्यय आला होता. ठरवलेल्या मुदतीत कर्ज फेड शक्य न झाल्याने कित्येक कुटुंबांना सिबिल मध्ये नकारात्मक रेटिंग येत असल्याने कोणत्याही संस्थेकडून कर्ज मिळण्यास अडथळे येत होते. अशावेळी विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेने आपल्या अडचणीत आलेल्या थकीत खातेदारांसाठी महत्वाचा निर्णय घेत काही विशेष सूट व सुविधा देत कर्जमुक्त मेळाव्याचे आयोजन केले. बँकेचे अध्यक्ष विजय वर्मा यांनी हा महत्वाचा निर्णय घेत आपल्या ऋण खाते धारकांच्या आयुष्यात नंदनवन फुलविण्याचे ठरविले. या निर्णयाला धरून एकाच दिवशी 13 जागेवर कर्ज मुक्ती मेळाव्याचे आयोजन केले गेले. त्यास प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला असून तब्बल 300 कर्ज खात्यात अंदाजे 9 करोड रुपये तडजोड झाली आहे.
भंडारा व तुमसर शाखेतही कर्जमुक्ती शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिरात भंडारा शाखेंतर्गत मोहाडी व ठाणा, तुमसर शाखेंतर्गत अंतर्गत शाखा गोंदेखारी, नाकाडोंगरी, गर्रा / बघेडा येथील शाखांनी सहभाग घेतला. शिबिरात बँकेचे महाप्रबंधक अनिलकुमार श्रीवास्तव, मुख्यप्रबंधक प्रकाश देशपांडे उपस्थित होते. यावेळी भंडारा व तुमसर शाखांतर्गत एकूण 78 थकीत कर्जदारांनी भेटी दिल्या. त्यातील 32 थकीत कर्जदारांनी बँकेच्या विशेष सूट योजनेचा लाभ घेऊन 1 कोटी इतक्या कर्ज रकमेतून मुक्तता मिळविली. बँकेची कर्ज मुक्ती योजना सामान्य थकीत ऋण खातेदारासाठी दिलासा देणारी योजना ठरली, अशी भावना यावेळी खातेदारांनी व्यक्त केली. यावेळी विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेचे अध्यक्ष विजयकुमार वर्मा, महाप्रबंधक विमल कुमार, महाप्रबंधक अनिलकुमार श्रीवास्तव यांनी कर्ज मुक्ती मेळावे यशस्वी केल्याबद्दल बँकेचे सर्व क्षेत्रीय प्रबंधक, शाखा प्रबंधक यांचे अभिनंदन केले.#Vidarbha Konkan gramin Bank