गडचिरोली : जिल्ह्यात वाघांची संख्या प्रचंड वाढली असून शहराच्या बाहेरील मार्गावर दिसणारा वाघ आता शहरात शिरल्याने लोकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. ही घटना गडचिरोलीतील आयटीआय चौकातील कृषी महाविद्यालयाच्या नर्सरीमधील असून सोमवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास अनेकांनी वाघाला बघितले. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी नर्सरी परिसरात दाखल झाले असून वाघावर पाळत ठेऊन आहेत.#khabarkatta
शहरातील कृषी महाविद्यालय परिसरात असेलल्या नर्सरीमध्ये वाघ दिसून आल्याने एकच खळबळ उडाली. यासंदर्भात माहिती मिळताच वनविभागाचे पथक नर्सरी परिसरात दाखल झाले. तासाभरापासून त्या वाघावर वन कर्मचारी नजर ठेऊन आहेत. सुरेक्षेच्या दृष्टिकोनातून दोनही मार्ग बंद करण्यात आले आहे. कृषी महाविद्यालयाच्या मागील बाजूस जंगल असल्याने त्या मार्गे हे वाघ शहरात आल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या वाघांना जेरबंद करण्यासाठी चंद्रपूरहून विशेष पथक गडचिरोलीसाठी रवाना झाले असून लवकरच ते नर्सरीस्थळी पोचतील असे वन विभागाकडून सांगण्यात आले आहे. #Chandrapur