सफाई कामगारांना कामावरून कमी करण्यात येऊ नये; अन्यथा तीव्र आंदोलन...#Sweepers should not be retrenched; Otherwise intense agitation - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



सफाई कामगारांना कामावरून कमी करण्यात येऊ नये; अन्यथा तीव्र आंदोलन...#Sweepers should not be retrenched; Otherwise intense agitation

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

शहर महानगरपालिका अंतर्गत नालेसफाईचे कंत्राट मिळालेल्या कंत्राटादरमार्फत 50 टक्के कामगारांची कपात केली जाणार आहे. त्यामुळे जवळपास 106 अस्थाई कामगारांवर बेरोजगारी संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. चंद्रपूर शहर स्वच्छ करण्यासाठी मोठी जबाबदारी असल्याने या कामगारांना कामावरून कमी करण्यात येऊ नये, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कामगार नेत्या अॅड. हर्षल चिपळूणकर यांनी दिला.

महानगरपालिका क्षेत्रातील स्वच्छता विभागाच्या महाकाली झोनअंतर्गत कामगारांची बैठक विदर्भ प्रहार कामगार संघटनेच्या माध्यमातून आज घेण्यात आली. यावेळी ऍडव्होकेट हर्षल चिपळूणकर यांनी कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या. चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये नालेसफाई करण्यासाठी 206 अस्थायी कामगार आहेत. मात्र नव्या कंत्राटदाराने कामगारांच्या संकेत 50 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे 106 कामगारांवर बेरोजगारी येण्याची शक्यता आहे. चंद्रपूर शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी या कामगारांवर आहे. असे असतानाही अचानक केवळ स्वतःच्या लाभापोटी 50 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. कामगार विरोधी कोणताही निर्णय खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा अॅड. चिपळूणकर यांनी दिला आहे.

Pages