चंद्रपूर जिल्ह्यात गारांचा पाऊस; गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान...#Hail rain in Chandrapur district; Hailstorm caused huge loss to farmers - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



चंद्रपूर जिल्ह्यात गारांचा पाऊस; गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान...#Hail rain in Chandrapur district; Hailstorm caused huge loss to farmers

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

गडचांदुर:मागील दोन दिवसांपासून अवकाळी पावसाच्या हजेरीने शेतकरी वर्ग अगोदरच हैराण असतांना आज दिनांक 19 ला सायंकाळी 4 च्या दरम्यान गडचांदूर शहरात व परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली, अनेक शेतकऱ्यांचे अजूनही रब्बी हंगामातील हरभरा,गहू,मिरची हे पीक शेतात उभे आहेत.#khabarkatta

काहींनी पावसाचा अंदाज घेऊन कापणी केली परंतु त्यांचे ढीग शेतातच होते, तर काहींनी ढीग मारून टाकले होते, अचानक झालेल्या गारपिटीने शेतकरी आपल्या शेतातील पिक झाकू शकले नाहीत व त्यामुळे हरभरा,गहू,मिरची ओली झाल्याने नुकसान झाले आहे.#chandrapur

विमा कंपनी व कृषी विभागाने सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते उद्धव पुरी यांनी केली आहे

Pages