भाजप नेत्याच्या मुलीची पुण्यात गळाफास घेऊन आत्महत्या...#BJP leader's daughter commits suicide by strangulation in Pune - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



भाजप नेत्याच्या मुलीची पुण्यात गळाफास घेऊन आत्महत्या...#BJP leader's daughter commits suicide by strangulation in Pune

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

गडचिरोली : येथील रहिवासी व पुण्यात खासगी कंपनीत नोकरी करत असलेल्या एका अभियंता तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 19मार्चला सकाळी उघडकीस आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.#khabarkatta

साहिली वासुदेव बट्टे (24, रा. झाशीनगर, चंद्रपूर रोड, गडचिरोली) असे त्या तरुणीचे नाव आहे. भाजप नेते वासुदेव बट्टे व माजी नगरसेविका वर्षा वासुदेव बट्टे यांची ती कन्या आहे.ती पुण्यात राहत होती. एका खासगी कंपनीत अभियंता म्हणून काम करणाऱ्या साहिलीने 18 मार्चला रात्री पुण्यातील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. हीघटना 19 रोजी सकाळी उघडकीस आली, त्यानंतर बट्टे दाम्पत्याने तातडीने पुण्याला धाव घेतली आहे.फोनवरील तो संवाद ठरला अखेरचा...#chandrapur

साहिलीसोबत तिचा भाऊ काही दिवस पुण्यात राहत होता, पण तो गावी परतला होता. त्यामुळे ती एकटीच राहत होती. दरम्यान, 18 रोजी रात्री साहिलीने घरी फोन केला. यावेळी तिने आई - वडिलांशी भ्रमणध्वनीवरुन संवाद साधला. मात्र, हा संवाद अखेरचा ठरेल, याची कल्पना आई- वडिलांना नव्हती.#gadchiroli

Pages