शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पहिल्यांदाच मानवी अवयवांचे प्रदर्शन...#First time display of human organs in Government Medical College - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पहिल्यांदाच मानवी अवयवांचे प्रदर्शन...#First time display of human organs in Government Medical College

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

अनेकांना शरीरातील अवयवाबद्दल ज्ञान आहे. मात्र, त्यांना जवळून बघण्याची संधी कधी मिळाली नाही. सर्वसामान्य नागरिकांना व विद्यार्थ्यांना मानवी शरीरातील अवयवाबद्दल अधिक माहिती मिळावी त्यांना अवयवाचे कार्य जाणून घेता यावे यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरिरशास्त्र विभागाच्या वतीने अवयव प्रदर्शन आयोजित केले आहे.

या प्रदर्शनाला जिल्हाभरातील 6 हजार शाळकरी विद्यार्थ्यांनी भेटी देत मानवी मेंदू, फुफ्फुसे, हृदय, यकृत, आतडे, वृषण, प्लीहा जवळून बघत या अवयवाचे कार्य जाणून घेतले. शरीरातील अवयव किती महत्वपूर्ण कामगिरी बजावतात यांची माहिती जाणून घेतली.#khabarkatta

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शरीरशास्त्र विभागाच्या वतीने 16 ते 21 मार्च या कालावधी दरम्यान मानवी अवयव प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मानवी शरीरातील विविध अवयव प्रदर्शनीसाठी ठेवण्यात आले आहे. यासोबतच विविध सामाजिक विषयांवर जागरूकता निर्माण करण्याचे काम करण्यात येत आहे. यामधे मानवी मेंदू, मृतदेह, फुफ्फुसे, हृदय, यकृत, आतडे, वृषण, प्लीहा इत्यादी अवयव शाळकरी विद्यार्थ्यांना दाखवून त्यांचे कार्य समजावून सांगण्यात येत आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच हा प्रयोग होत आहे. त्यामुळे या प्रदर्शनाला शाळकरी विद्यार्थी व नागिरकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. आतापर्यंत चंद्रपूर शहरासह जिल्हाभरातील किमान पाच ते सहा हजार विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाचा लाभ घेतला आहे.#chandrapur

या प्रदर्शनाचे आयोजन महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ. अशोक नितनवरे, शरीररचना विभाग प्रमुख डॉ. श्रुती मामीडवार, तसेच महाविद्यालय सरचिटणीस विशाल बिराजदार, रोहित नाईकवाडे, नबा शिवजी, विराज चाटे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्याथी्र अनमोल पडोळे, समृद्धी शिंदे, अदिती खोडवे, जान्हवी वानखेडे, नेत्रा कडू, प्राजक्ता बावनकर, गणेश थोरात, हनुमान टाले, श्रेयस शिरसागर, पल्लवी भगत, साची वानखेडे, सुकन्या बेलोकर, शुभम हेंबाडे, अभिषेक सारोकार, दीप काळे, आस्था आडे, गार्गी बोरोकर, प्रसाद आबादार, साक्षी अवचार, सिद्धी सोमाणी, नताशा प्रभू, दीक्षा यादव, वैष्णवी चव्हाण, देवेन जैन, निनांशु गंदेचा, साकेत करहाले, तेजस पाठक, वैष्णवी चव्हाण हे शाळकरी विद्यार्थी व नागरिकांना अवयवाचे महत्व पटवून देत आहे. विद्यार्थ्यांचे मानवी शरिरातील अवयवाचे कार्य, तसेच विकृतीमुळे अवयवावर होणारे परिणाम जाणून घेतले.#khabarkatta

Pages