खबरकट्टा/चंद्रपूर:
वर्धा: बनावट नोटांचा उपयोग करीत व्यवहार करणाऱ्या चार युवकांच्या टोळीने या नोटा दिल्लीतून आणल्याची कबुली दिल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. निखिल लोणारे, स्वप्नील उमाटे, प्रीतम हिवरे व साहिल साखरकर अशी या विशीतील आरोपींची नावे असून त्यांना बारा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींकडून पाचशेच्या 94 नोटा जप्त करण्यात आल्या आहे.#khabarkatta
निखिल लोणारे यास दुचाकीने येत असताना गुप्त माहिती मिळाल्यानंतर पकडण्यात आले. त्याने स्वप्नील, प्रीतम व साहिल सोबत दिल्लीला गेलो व तेथून या नोटा आणल्याचे सांगितले. प्रामुख्याने ग्रामीण भागात या नोटा त्यांनी चालवल्या. खऱ्या व बनावट यातील फरक शेतकरी वर्ग ओळखू शकत नाही. म्हणून ग्रामीण भागात या नोटांचा व्यवहार केल्याची कबुली दिल्याची माहिती मिळाली. पण हे प्रकरण पोलीसांसाठी एक आव्हानच ठरण्याची चर्चा आहे.#vardha