10वी आणि 12वीची परीक्षा संपली. फिरायचा मूड झाला. मात्र, वाहन नव्हते. मग काय, दोघांनी मिळून दुचाकी चोरली. ही घटना बल्लारपूर येथे घडली. दुचाकी चोरणाऱ्यांपैकी एक दहावी आणि दुसरा बारावीतील विध्यार्थी आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.#khabar katta
बल्लारपूर येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इयत्ता 10वी आणि 12वी मध्ये शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांनी परीक्षा संपल्यानंतर वाहनाची गरज भागवण्यासाठी चोरी केल्याची घटना घडली आहे. परीक्षा संपल्यानंतर त्यांना प्रवासासाठी वाहनाची गरज होती. त्यामुळे शहरातील दादाभाई नौरोजी वार्डातील एका कॉलनीतील दोन अल्पवयीन मुलांनी रात्री मोटारसायकल चोरली. मोटारसायकलची नंबरप्लेट काढून त्यावर सिद्धू मुसेवाला याचा फोटो लावला आणि वाहनाच्या टाकीवर त्याचे नावही लिहिले. आणि गाडी सुरू करण्यासाठी बटण बसवले.#chandrapur
दुचाकी चोरीची ही घटना 9 मार्चच्या रात्री 2वाजण्याच्या सुमारास घडली. चोरीची माहिती मिळताच पोलिसांनी संपूर्ण शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्हीमध्ये चोरट्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नव्हते. पण चोरांच्या पांढऱ्या चप्पल आणि उंचीच्या आधारे पोलिसांनी आरोपींना पकडले. आणि चोरीचा गुन्हा दाखल करून मोटारसायकल जप्त केली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.#ballarshah
या दोघांच्या मित्रांकडे दुचाकी, चारचाकी वाहने आहेत. मात्र आपल्याकडे गाडी नाही. याचे दुःख त्यांना होते. घरची आर्थिक स्थिती जेमतेम असल्याने गाडी खरेदी करणे अशक्य होते. त्यामुळे या दोघांनी चोरी केली. दुचाकी चोरल्यानंतर चारचाकी वाहन चोरण्याचा त्यांचा बेत होता, असे ठाणेदार उमेश पाटील यांनी सांगितले.
