सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असलेल्या एसटीत आता महिलांचा आवाज आहे. राज्य सरकारने महिलांसाठी 50 टक्के सवलतीच्या प्रवासाची घोषणा केल्यानंतर शनिवारी एका दिवसात तब्बल 11 लाख 30 हजार 283 महिलांनी एसटीने प्रवास केला आहे. त्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करणारे एसटी महामंडळही मालामाल झाले असून तब्बल महिला प्रवाशांच्या तिकिटातून एकूण 5 कोटी 68 लाख रुपयांची कमाई झाली आहे.#khabarkatta
कोरोना महामारीमुळे एसटीची प्रवाशी संख्या कमालीची खालावली असल्याने त्यांना आपला आर्थिक गाडा चालवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे कामगारांचे पगार चुकते करण्यासाठी राज्य सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जातो. दरम्यान, रोडावलेली प्रवाशी संख्या वाढवण्याबरोबरच महिलांना दिलासा देण्यासाठी सरकारने एसटीच्या तिकिटात 50 टक्के सवलत जाहीर केली आहे. त्या पार्श्वभूमीवर एसटीने 'महिला सन्मान योजना' जाहीर करत शुक्रवारपासून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे.#chandrapur