चिमूर तालुक्यातील आमडी (बेगडे ) येथे 14 मार्च ला सायंकाळी झालेल्या चक्रीवादळात वीज पडून दोन गायी दगावल्या व अन्य तीन जखमी झालेल्या आहेत .
सवीस्तर वृत्त असे आहे की , आज सायकांळी 7 वाजताच्या चक्रीवादळात बंडु महाराज गीरी यांच्या मालकीच्या गुरांवर वीज पडुन दोन गायी ठार तर अन्य तीन गुरे जखमी झाले आहेत . ऐन वेळेवर शेतकऱ्यांच्या गुरांचे नुकसान झाल्याने शेतकरी चींतेत पडला आहे .शासनानी लवकरात लवकर मदत द्या अशी मागणी होत आहे .#khabarkatta