वाईन शॉप मालकाने ग्राहकाच्या डोक्यात मारली दारूची बाटली...#Wine shop owner hits customer on head with liquor bottle - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



वाईन शॉप मालकाने ग्राहकाच्या डोक्यात मारली दारूची बाटली...#Wine shop owner hits customer on head with liquor bottle

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

दारु दुकानदार आणि ग्राहक ह्यांच्यातील वाद नवे नाहीत. मात्र, दारू दुकानदाराचा संताप अनावर होऊन त्याने चक्क ग्राहकाच्या डोक्यावर दारूची बाटली फोडून ग्राहकाला गंभीर जखमी केल्याची घटना जटपुरा गेट जवळीक आनंद वाइन शॉप येथे घडली आहे. #Chandrapur

दुकानाचे संचालक संदिप अडवाणी ह्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. प्राप्त माहितीनुसार शहरातील जटपुरालगत असलेल्या आनंद वाइन शॉपचे मालक चंद्रकांत अडवाणी यांचा मुलगा संदीप अडवाणी याने शुल्लक वादातून एका ग्राहकाच्या डोक्यावर दारूची बॉटल फोडली. त्यात तरुण ग्राहक गंभीर जखमी झाला असून, उपचारासाठी त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या ग्राहकाची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी संदीप अडवाणी याला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मंगळवारी रात्री 8.30 वाजता घडली.#khabarkatta

शहरातील अत्यंत गजबजलेल्या मार्गालगत हे दारूचे दुकान असून मद्यापींची येथे कायम गर्दी असते. जिल्ह्यातील दारूबंदी उठल्यानंतर जटपुरा गेटलगत चंद्रकांत अडवाणी या दारू व्यावसायिकाने आनंद वाइनशॉप सुरू केले. या वाइन शॉपमुळे रस्त्यावर नेहमीच वाहतुकीचा खोळंबा होत आहे. सायंकाळी या मार्गावरून महिलांना ये-जा करताना मन:स्ताप सहन करावा लागतो. मंगळवारी रात्री 8.30 वाजताच्या दरम्यान एक ग्राहक वाइन शॉपमध्ये गेला असता शुल्लक कारणावरून भांडण झाले. वाद विकोपाला गेला काउंटरवर बसून असलेला चंद्रकांत अडवाणीचा मुलगा संदीपने ग्राहकाच्या डोक्यावर दारूची बॉटल त्यामुळे तरूण रक्तबंबाळ झाला. या मारहाण प्रकरणी तरुणाच्या तक्रारीनंतर संदीप अडवाणीला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे.

Pages