स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आदिवासी युवकाची नक्षल्यांकडून हत्या...#Tribal youth preparing for competitive exam killed by Naxals - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आदिवासी युवकाची नक्षल्यांकडून हत्या...#Tribal youth preparing for competitive exam killed by Naxals

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आदिवासी युवकाची नक्षल्यांनी गुरुवारी रात्रीच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या केली. साईनाथ नरोटे (26) असे मृत युवकाचे नाव असून तो भामरागड तालुक्यातील मर्दहुर या नक्षलग्रस्त गावातील रहिवासी होता. मर्दिनटोला चकमकीनंतर नक्षल चळवळ खिळखिळी झाली होती. मात्र, काही महिन्यांपासून दक्षिण गडचिरोली भागात पुन्हा एकदा नक्षलवादी सक्रिय झाले असून त्यांनी पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून साईनाथची हत्या केली.

होळीनिमित्त साईनाथ आपल्या गावी आला होता. गुरुवारी रात्रीच्या सुमारास काही सशस्त्र नक्षल्यांनी गावात येऊन साईनाथची गोळ्या झाडून हत्या केली. साईनाथ हा उच्चशिक्षित असून गडचिरोली येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता. अधिकारी बनण्याचे स्वप्न अधुरे साईनाथ हा अभ्यासात हुशार होता. काही काळ गावात तयारी केल्यानंतर तो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी गडचिरोलीत आला. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करून अधिकारी बनण्याचे त्याचे स्वप्न होते. मात्र, नक्षल्यांनी त्याची पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून हत्या केली.

A tribal youth who was preparing for the competitive examination was shot dead by Naxalites around Thursday night. The deceased youth has been identified as Sainath Narote (26) and was a resident of Mardhur, a Naxal-hit village in Bhamragarh taluk. After the Mardintola encounter, the Naxal movement came to a standstill. However, for a few months, Naxalites have become active in South Gadchiroli area once again and they killed Sainath on the suspicion of having police information.#khabarkatta chandrapur

Sainath had come to his village on the occasion of Holi. Around Thursday night, some armed Naxalites came to the village and shot and killed Sainath. Sainath is highly educated and was preparing for the competitive examination in Gadchiroli. Sainath was brilliant in his studies, his dream of becoming an officer unfulfilled. After preparing for some time in the village, he came to Gadchiroli to study for the competitive examination.#Gadchiroli

His dream was to become an officer after passing the competitive examination. However, the Naxalites killed him on the suspicion that he was a police informant

Pages