बिबट्या आला रे! महिलेवर हल्ला करून बिबट्याचा चक्क घरातच ठिय्या...# - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



बिबट्या आला रे! महिलेवर हल्ला करून बिबट्याचा चक्क घरातच ठिय्या...#

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील वायगाव येथे बिबट्याने एका महिलेवर हल्ला करून चक्क घरात ठिय्या मांडला. दरम्यान, बिबट्याला सात तासाच्या अथक परिश्रमानंतर बेशुध्दीकरणाचे इंजेक्शन देवून जेरबंद करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा बफर क्षेत्रातील गावात तसेच वनालगतचा गावामध्ये वन्यप्राणी-मानव संघर्ष तीव्र झाला आहे. वन्यप्राणी घरामध्ये शिरकाव करू लागले आहे. चंद्रपूर बफर वनपरिक्षेत्रातील मामला उपक्षेत्रात येणाऱ्या वायगांवात एका महिलेवर हल्ला करून बिबट्याने चक्क घरात ठिय्या मांडला.#khabarkatta 

या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल होवून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी हालचाली करण्यात आल्या. मात्र, बिबट जेरबंद झाला नाही. वनविभागाचे शीघ्र कृती दलाचे पथक व शूटर व डॉक्टरांनी बिबट्याला बेशुध्दीकरणाचे इंजेक्शन देवून जेरबंद केले. तब्बल सात तास रेस्क्यू ऑपरेशन राबविल्यानंतर बिबटला जेरबंद करण्यात यश आले. या घटनेनंतर गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या परिसरात नागरिकांना दररोज वन्यप्राण्यांचे दर्शन होत असल्याने भीतीचे वातवरण निर्माण झाले आहे.

At Vaigaon in the buffer zone of the Tadoba Tiger Reserve, a leopard attacked a woman and trapped her in her house. After seven hours of tireless work, the leopard was imprisoned after being given an injection of disinfectant. The wildlife-human conflict has intensified in a village in the buffer zone of the Tadoba-Andhari Tiger Reserve. Wild animals have started entering the house. A leopard has attacked a woman and trapped her in a house in Waigaon, which falls under the Malam sub-zone of Chandrapur buffer forest area.#khabarkatta chandrapur

The forest department officials were informed about the incident. Senior officials of the forest department entered the spot and took steps to imprison the leopard. However, Bibat was not jailed. The forest department's quick action team and shooters and doctors captured the leopard by injecting it with disinfectant. After seven hours of rescue operation, Bibat was successfully captured. After this incident, there was a tense situation in the village.

Pages