सर्वोदय मित्र परिवारातर्फे स्नेहमिलन सोहळा संपन्न...#A friendly ceremony was held by the Sarvodaya Mitra Parivar - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



सर्वोदय मित्र परिवारातर्फे स्नेहमिलन सोहळा संपन्न...#A friendly ceremony was held by the Sarvodaya Mitra Parivar

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:
सर्वोदय महाविद्यालय सिंदेवाही येथे एकत्र शिकणारे वर्गमित्र दिनांक 5 मार्च 2023 रोजी रविवारला यंग रेस्टॉरंट मध्ये सर्वोदय मित्र परिवारातर्फे स्नेह मिलन सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यामध्ये संपूर्ण एकत्र शिकलेले मित्र सहकुटुंबासहित एकत्र आले त्यानिमित्ताने त्यातील एक परममित्र डॉक्टर प्राध्यापक प्रदीप मेश्राम यांनी बहुजन समाजातील कवी "वामनदादा कर्डक" यांच्या जीवनावर प्रबंध सादर करून आचार्य पदवी प्राप्त केली यात त्यांच्या सपत्नीक सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राध्यापक मनोज पाकमोडे हे होते.#khabarkatta chandrapur

स्नेह मिलन घडवून येत असताना मित्रांनी एकमेकांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत सपत्नीक मनोगत व्यक्त करण्यात आले. यात सूत्रसंचालन करणारे प्राध्यापक नितीन सुरपाम यांनी अतिशय स्नेह मिलनात काव्यवाचन, चारोळ्या, कविता आणि शेरोशायरीने रंगpp भरले. यामध्ये सर्व मित्र आपले सहकुटुंब सहभागी झाले आणि यामध्ये अनेक खेळ खेळून खूप धमाल मौजमस्ती केली. यात प्रास्ताविक सचिन चिंतलवार सूत्रसंचालन प्राध्यापक नितीन सुरपाम तसेच आभार प्रदर्शन राहुल उके यांनी केले.#sindewahi

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन धुळेवार, शेखर येरमे यांनी केले. यात सहभागी सौ.राजनंदनी पाकमोडे, सौ.विशाखा राजेंद्र चहांदे, सौ.शुभांगी दिनेश राहाटे, सौ.राणी आशिष निकोडे, सौ.वैष्णवी धुळेवार, संपदा येरमे, संदीप उपरकर, कमलाकर बनकर इत्यादी स्नेह मिलन कार्यक्रम यशस्वीतेने पार पाडले.

Pages