ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी तालुक्यातील हळदा, रणमोचण, आवळगाव, बोढेगाव, सोंन्द्री, खरकाडा, बोळधा या रेती घाटाचे नियमानुसार लिलाव झाले आहे.पण २८फरवरी ला पर्यावरण विभागाने रेती घाटावर बंदी घातली. त्यानंतर नदी पात्रातून कुठल्याही रेती घाट मालकाला रेती उपसा करण्याचा अधिकार नाही व तसा परवाना सुध्दा नाही. तरी पण ब्रम्हपुरी तालुक्यातील या सर्व बंद वाळू घाटातून मोठ्या प्रमाणावर आधुनिक तंत्राच्या साहाय्याने उपसा सुरू आहे.#khabarkatta
तालुक्यातील महसूल व पोलीस हे दोन्ही यंत्रणा सध्या मुंग गिळून गप्प बसल्याचे चित्र बघायला मिळत आहे. ब्रम्हपुरी तालुक्यातील महसूल अधिकारी व रेत तस्करांमधील दुवा म्हणून के. बी नावाचा दलाल तालुक्यात सक्रिय आहे. के. बी दलालाचे पिंपळगाव - खरकाडा नदी पात्रातून आरमोरी येथील एका नगरसेवकांच्या सहा टिपर व सहा टॅक्टर किरायाने घेऊन ब्रम्हपुरी शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल प्रशासनाच्या आर्शिवादाने आपल्या खशात टाकण्याचे काम तालुक्यातील के. बी नावाच्या दलाल करत आहे. के. बी दलालांच्या माध्यमातून शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडवून शासनाला चुना लावत असल्याचे चित्र आहे. के. बी. नावाच्या या दलालाने काही वर्षात कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमा केली आहे.#chandrapur
के. बी नावाचा दलाल हा रेती तस्करांकडुन ऍन्ट्री च्या नावाखाली लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याची माहिती मिळत आहे. ब्रम्हपुरी तालुक्यातील अधिकारी व के. बी नावाचा दलाल यांच्या सक्रिय संबधाने मोठ्या प्रमाणावर घाटातून वाळुचा उपसा सुरू आहे. याकडे चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व महसूल मंत्री राधाकृष्णन विखे पाटील यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.#khabarkatta 
