खबरकट्टा/चंद्रपूर:
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याची धमकीचा फोन नागपूर पोलिसांना आला होता. यानंतर नागपूर पोलिसांच्या बॉम्ब शोधक पथकाने रात्री 12 वाजताच्या सुमारास देवेंद्र फडणवीस यांच्या घराची तपासणी केली. मात्र हा फेक कॉल असल्याचं तपासात समोर आलं आहे. दरम्यान हा खोडसाळपणा करणाऱ्याला नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सध्याच्या स्थिती देवेंद्र फडणवीस यांच्या घरी कोणतीही सुरक्षा वाढवण्यात आलेली नाही.#khabarkatta chandrapur
दरम्यान, फडणवीस यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा इसम दुखावलेला होता. त्याने केवळ दिशाभूल करण्याच्या उद्देशाने हा फोन केला होता. त्याच्या कॉलमध्ये सांगण्यात आल्याप्रमाणे कोणतीही वस्तू किंवा तथ्य तिथे आढळलेले नाहीत. धमकीचा कॉल करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आहे. तसंच पुढील कारवाई केली जात आहे, अशी माहिती नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली