चिराण सागवानाची पहिली खेप अयोध्येसाठी रवाना होण्यास तयार...#First consignment of Chiran teak ready to leave for Ayodhya - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



चिराण सागवानाची पहिली खेप अयोध्येसाठी रवाना होण्यास तयार...#First consignment of Chiran teak ready to leave for Ayodhya

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:


अयोध्या येथे प्रभू श्रीरामाचे मंदिर उभारले जात आहे.मंदिरातील महाद्वारसाठी चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील सागवान काष्ठाची निवड तज्ञ मंडळींनी केली होती.त्या अनुषंगाने चिराण सागवान लाकडांची विविध आकारात तयार केलेली 1855 घन फूटची पहिली खेप बल्लारपूर येथील वन विकास महामंडळाच्या आगारात सोमवार 27 मार्चला पोहचली अशी माहिती वन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक सुमित कुमार यांनी बोलतांना दिली आहे.#khabarkatta 

अयोध्या येथील श्री राम मंदिराच्या निर्माण कार्यासाठी फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेड आणि मे. लार्सन अँड ट्युब्रो लि. या कंपनीमध्ये सुमारे 1855 घन फूट चिराण सागवान लाकडाचा पुरवठा करण्यासाठी रूपये 1, 31, 31,850/- चा दिनांक 15 डिसेंबर 2022 रोजी विक्री करार करण्यात आलेला होता. श्री राम मंदिर उभारणीचे काम जसजसे पुढे जाईल तसतसे FDCM कडून अधिक सागवान लाकूड पुरवठा केला जाणार आहे.त्यानुसार फारेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेड यांच्या अखत्यारीत असलेल्या शासकीय आरागिरणी, आलापल्ली व बल्लारशाह येथे मागणीनुसार चिराण सागवान माल तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच दिनांक 19 जानेवारी 2023रोजी अयोध्या राममंदीर ट्रस्टचे प्रतिनिधी तसेच वास्तुविशारद चमू यांनी शासकीय आरागिरणी, आलापल्ली येथे भेट देऊन पुरवठा करण्याकरीता चिराण सागवान लाकडाचा आकार आणि गुणवत्ता निश्चित केली होती.हे विशेष.#chandrapur 

बल्लारशाह सागाचे वैशिष्ट्य

बल्लारशाह सागवान लाकडात तेलाचे प्रमाण जास्त असल्याने उच्च शक्ती, जास्त टिकाऊपणा आणि कीटक आणि वाळवी प्रतिकारक. फिनिशिंगनंतर तेलाचे प्रमाण जास्त असल्याने लाकडाची शायनिंग अतिशय सुंदर आणि आकर्षक असते.

वनमंत्र्यांचा पुढाकार आणि संकल्पना

सुधीर मुनगंटीवार, अध्यक्ष एफडीसीएम आणि वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री, महाराष्ट्र सरकार यांनी पुढाकार घेऊन एफडिसीएम मध्ये एक आध्यात्मिक संकल्पना मांडली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली,एफडसीएम हे श्री राम जन्मभूमी मंदिराच्या बांधकामासाठी उत्कृष्ट दर्जाच्या सागवान लाकडाचा पुरवठा करत आहे.असेही सुमित कुमार म्हणाले.29 मार्चला विधिवत पूजन करून हे काष्ठ शोभायात्रेच्या माध्यमातून अयोध्या रवाना होणार आहे.

Pages