उन्हामुळे शाळा सकाळच्या सत्रात घ्या; खासदार बाळू धानोरकर यांची मागणी...#MP Balu Dhanorkar - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



उन्हामुळे शाळा सकाळच्या सत्रात घ्या; खासदार बाळू धानोरकर यांची मागणी...#MP Balu Dhanorkar

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर :
जिल्ह्यात दरवर्षी मार्च महिन्यापासूनच उन्हाच्या झळा सुरू झाल्या आहेत. उन्हाळ्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होत असतो. त्यामुळे सकाळच्या सत्रात इंग्रजी माध्यमातील शाळा सुरू करण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे.# khabarkatta

साधारणपणे एप्रिल, मे व जून या तीन महिन्यात तापमान मोठ्याप्रमाणावर वाढलेले दिसते. या काळात अनेकदा उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागतो. यंदा मात्र मार्च महिन्यापासूनच तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उष्णतेची लाट व त्याच्या परिणामांपासून करावयाचा बचाव याबाबत उपाय आवश्यक आहे.

उष्णतेमुळे होणारा शारिरीक त्रास किरकोळ ते गंभीर स्वरुपाचा असू शकतो. किरकोळ त्रासाच्या स्वरुपात शरिरावर उष्णतेमुळे रॅशेश उमटणे, हातापायाला गोळे येणे, चक्कर येणे अशा स्वरुपाचा त्रास असतो. गंभीर प्रकारात उष्माघात होतो. यात व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो. ही स्थिती लक्षात घेता इंग्रजी माध्यमातील शाळा सकाळच्या सत्रात सुरू करण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे.#Take the school in the morning session due to summer;MP Balu Dhanorkar's demand

Chandrapur: Every year, summer heat has started in the district from the month of March itself. Students are suffering due to summer. Therefore, MP Balu Dhanorkar has requested the education department to start English medium schools in the morning session. 

Generally, the temperature rises to a great extent in the three months of April, May and June. Heat wave is often faced during this period. This year, however, it is seen that the temperature has increased since the month of March. So there is a need for measures to protect against heat wave and its effects. 

Physical discomfort caused by heat can range from mild to severe. In the form of minor problems, there are rashes on the body due to heat, cramps in the limbs, dizziness. Severe heatstroke occurs. It can also cause the death of a person. Considering this situation, MP Balu Dhanorkar has requested the Education Department to start English medium schools in the morning session.#khabarkatta chandrapur

Pages