मोलमजुरी, धुणीभांडी करणाऱ्या 102 महिलांचे वैष्णोदेवी दर्शन...#Vaishnodevi darshan of 102 women doing wage labour, washing dishes - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



मोलमजुरी, धुणीभांडी करणाऱ्या 102 महिलांचे वैष्णोदेवी दर्शन...#Vaishnodevi darshan of 102 women doing wage labour, washing dishes

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:
माता वैष्णोदेवीचे दर्शन घेण्याची आस साऱ्यांनाच असते. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे अनेकांना दर्शनाचा लाभ घेता येत नाही. हातावर आणून पानावर खाणाऱ्या, मोलमजुरी आणि धुणीभांडी करून आपल्या परिवाराचा उरदनिर्वाह करणाऱ्या महिलांसाठी तर हे दिवास्वप्न ठरते. पण चंद्रपुरातील नितीन व भारती गुंदेचा यांनी अशा तब्बल 102 महिलांचे स्वप्न पूर्ण केले. त्यांना स्वखर्चाने माता वैष्णोदेवीचे दर्शन घडवून आणले.#khabarkatta

या 102 महिलांचे रेल्वेने जाणे-येणे, सहा दिवसाचे भोजन, रात्रीचा मुक्काम, उणे 5 अंश सेल्सीअसच्या थंडीत सर्व सोयी उपलब्ध करून त्यांना माता वैष्णोदेवी व भैरवबाबांचे दर्शन घडवून आणल्याबद्दल या अभिनव उपक्रमाचे महानगरात कौतुक होत आहे. त्या सर्व महिलाही अगदी भारावून गेल्या आहेत. जम्मू कश्मीरमधील त्रिकूट पर्वतात माता वैष्णोदेवीचे भव्य मंदिर आहे. प्रत्येकाला मातेच्या दर्शनचा लाभ मिळत नाही. पण चंद्रपुरातील नितीन व भारती गुंदेचा यांनी जिल्ह्यातील मोलमजुरी, धुणीभांडी करणाऱ्या 102 महिलांना एकत्र आणले आणि वैष्णोदेवीचे दर्शन घडवले. त्यांनी या सर्वाच्या रेल्वेची तिकीट आरक्षित केली होती.#vaishodevi darshan

37 तासाच्या प्रवासानंतर सर्वजण कटरा येथे पोहोचल्या. योनका येथे रोटरी क्लबव्दारे सर्व महिलांची मोफत शारीरिक क्षमता तपासणी करण्यात आली. माता वैष्णोदेवीचा गड चढण्यासाठी त्यातील 15 महिला असमर्थ ठरल्या. त्यांनी तेथूनच दर्शन घेतले. त्यांना थांबण्याची व्यवस्था केल्यानंतर उर्वरित महिलांनी गडावर चढायला सुरूवात केली. रात्री 8 वाजता सर्व महिला डोंगराच्या पायथ्याशी जावून पोहोचल्या. त्यांना माता वैष्णोदेवीचे दर्शन झाले. गडावर मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी भैरवबाबांची यात्रा पूर्ण केली. तसेच अर्धकुमारी गुहेचेही दर्शन घेवून महिला गडाखाली

त्यांच्यासाठी हे जणू स्वप्नवतच होते. दर्शन झाल्यानंतर सर्वांनी परतीचा प्रवास केला. भद्रावती रेल्वेस्थानक येथे त्यांचे आगमन होताच रोटरीचे अध्यक्ष अजय जयस्वाल, सुनिता जयस्वाल यांनी सर्वाना फळे, थंड पेये व मिठाईचे वाटप केले. या यात्रेचे नियोजन रोहित गुंदेचा, विठ्ठल झाडे, आजोबा उके, शीतल, राधिका सचदेवा, समिक्षा, अनु सोमनाथ, रितू वर्मा यांनी केले.# khabarkatta Chandrapur 

Khabarkatta/Chandrapur:

Everyone has a wish to see Mother Vaishno Devi. However, due to economic conditions, many people are unable to avail Darshan. This becomes a daydream for the women who feed their families by hand-picked food, wage labor and washing dishes. But Nitin and Bharti Gundecha from Chandrapur fulfilled the dream of as many as 102 such women. He brought darshan of Mata Vaishno Devi at his own expense.

This innovative initiative is being appreciated in the metropolis for providing these 102 women with train travel, food for six days, overnight stay, all facilities in minus 5 degree Celsius cold and giving them darshan of Mother Vaishnodevi and Bhairav ​​Baba. All those women are also overwhelmed. There is a grand temple of Mata Vaishno Devi in ​​Trikoot mountain in Jammu and Kashmir. Not everyone gets the benefit of mother's darshan.But Nitin and Bharti Gundecha from Chandrapur brought together 102 women who were wage laborers and washerwomen of the district and offered darshan of Vaishno Devi. He had reserved train tickets for all of them.

After a journey of 37 hours, everyone reached Katra. All women were given a free physical fitness test by the Rotary Club at Yonka. 15 women among them were unable to climb the fort of Mata Vaishno Devi. He took darshan from there. After arranging for them to stop, the rest of the women started climbing the fort. At 8 pm all the women reached the base of the hill. He saw Mother Vaishno Devi. After staying at the fort, the next morning completed the Yatra of Bhairav ​​Baba. Also visiting the Ardhkumari Cave under the Mahila Fort

It was like a dream for them. After darshan everyone traveled back. On their arrival at Bhadravati Railway Station Rotary President Ajay Jaiswal, Sunita Jaiswal distributed fruits, cold drinks and sweets to everyone. This Yatra was planned by Rohit Gundecha, Vitthal Zade, Grandpa Uke, Sheetal, Radhika Sachdeva, Samiksha, Anu Somnath, Ritu Verma.

Pages