2023 मध्ये उन्हाळ्यात तापमान आणि उष्णतेच्या लाटा वाढण्याची शक्यता...#Summer temperatures and heat waves likely to increase in 2023 - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



2023 मध्ये उन्हाळ्यात तापमान आणि उष्णतेच्या लाटा वाढण्याची शक्यता...#Summer temperatures and heat waves likely to increase in 2023

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:
जागतिक स्तरावर आणि भारतात 2010 पासून सतत वाढत चाललेले तापमान पाहता आणि ला निनो नंतर वाढत चाललेला अल निनोचा प्रभाव पाहता 2023 हे वर्ष सुद्धा उष्ण लहरी आणि अतिशय तापमान वाढीचे राहिल असा निष्कर्ष हवामान अभ्यासक आणि ग्रीन प्लानेट सोसायटीचे अध्यक्ष सुरेश चोपणे यांनी काढला आहे.

मागील 2022 वर्षी मार्च, एप्रिल, मे आणि जून महिन्यात अनेक उष्णतेच्या लाटा आल्या होत्या. मार्च 2022 मध्ये गुजरात, राजस्थानमध्ये 29, 30, 31 मार्च रोजीच उष्णतेच्या लाटा आल्या होत्या. एप्रिल महिन्यात सुद्धा 1, 2 तारखेला गुजरातमध्ये तर 26 ते 30 एप्रिल दरम्यान विदर्भात उष्णतेच्या लाटा आल्या.# खबरकट्टा

तसेच 8 ते 15 मे आणि 3 ते 7 जून दरम्यान विदर्भात उष्णतेच्या लाटांचा प्रकोप पहावयास मिळाला होता. महाराष्ट्रातील अनेक शहरात तापमान 46 डिग्री पर्यन्त गेले होते तर चंद्रपूरमध्ये तापमान 46.8 पर्यंत गेले होते. अति तापमान आणि उष्णतेच्या लाटेंचे उन्हाळ्यात 30 दिवस होते. हा गेल्या 50 वर्षातील विक्रम आहे. वाढत चाललेली जंगलतोड, शहरीकरण, औद्योगिकरण, प्रदूषण आणि विशेषत: वातावरणातील कर्बवायूचे प्रमाण (420 पीपीएम) हे जागतिक पातळीवर तापमान आणि उष्णतेच्या लाटेला कारणीभूत आहेत.#summer temperature increase in 2023

ऐतिहासिक तापमान वाढ

1850 ते 1950 ह्या औद्योगिक काळाच्या पूर्वीचे तापमान पाहता इ. स. 2000 नंतरची आकडेवारी पाहिल्यास लक्षात येते की 2000 मध्ये तापमान 0.67 अंशाने वाढले होते. 2005 मध्ये ते 0.91 झाले. 2010 मध्ये 0.97 अंशाने तर 2014 मध्ये ते 1.0 डिग्रीने वाढले. 2014 नंतर प्रत्येक वर्षीचे तापमान 1 डिग्रीच्यावर गेलेले होते. गेल्या दोन दशकात सर्वाधिक तापमान वाढ ही 2016 मध्ये 1.28 डिग्रीने वाढले होते. (ह्याच वर्षी 19 मे रोजी राजस्थानमध्ये आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान 51 डीसी नोंदवले गेले)

अल निनोचा प्रभाव

2020 पासून 2022 पर्यंत ला नीनाचा प्रभाव होता. त्यामुळे देशात चांगला पाऊस पडला. परंतु 2023 च्या सुरवातीला सामान्य (न्युट्रल) स्थिती आली असून पुढे अल निनोचा प्रभाव वाढणार असल्याचे नासा, जागतिक हवामान विभाग आणि इतर हवामान संस्थानी अभ्यासाअंती जाहीर केले आहे. अल निनोच्या प्रभावामुळे उन्हाळ्यात तापमान वाढीस मदत मिळण्याची शक्यता आहे. असे झाले तर 2023 हे वर्ष सुद्धा अत्यंत तापमानाचे वर्ष राहण्याची शक्यता आहे असे चोपणे यांनी म्हटले आहे.# summer temperature

Khabarkatta/Chandrapur :

Climate scientist and president of the Green Planet Society, Suresh Chopani, has concluded that 2023 will also be a year of heatwaves and extreme temperature rise, given the steady rise in temperatures globally and in India since 2010 and the increasing influence of El Nino after La Nino. # 

In the previous year 2022, there were several heat waves in the months of March, April, May and June. In March 2022, Gujarat, Rajasthan experienced heat waves only on March 29, 30, 31. In the month of April too, heat waves occurred in Gujarat on 1st and 2nd and in Vidarbha between 26th and 30th April. Also, heat waves were witnessed in Vidarbha between May 8 to 15 and June 3 to 7. In many cities of Maharashtra, the temperature went up to 46 degrees, while in Chandrapur, the temperature went up to 46.8 degrees. There are 30 days in summer of extreme temperatures and heat waves. This is the record of last 50 years. Increasing deforestation, 

urbanization, industrialization, pollution and especially atmospheric carbon dioxide concentration (420 ppm) are responsible for global warming and heat waves.

Historical temperature rise

Looking at the pre-industrial temperature from 1850 to 1950 etc. S. If we look at the data after 2000, we can see that the temperature increased by 0.67 degree in 2000. In 2005 it was 0.91. It increased by 0.97 degree in 2010 and 1.0 degree in 2014. Every year since 2014, the temperature has gone above 1 degree. The highest temperature increase in the last two decades was 1.28 degrees in 2016. (On May 19 this year, Rajasthan recorded the highest ever temperature of 51 DC)

Effect of El Nino

La Nina was in effect from 2020 to 2022. As a result, the country received good rains. But at the beginning of 2023, a normal (neutral) condition has been reached and the impact of El Nino will increase further, NASA, World Meteorological Department and other meteorological institutes have announced after the study. The effect of El Niño is likely to contribute to the rise in summer temperatures. If this happens, Chopane has said that the year 2023 is also likely to be a year of extreme temperature.


Pages