घरून लग्नाला विरोध असल्याने वर्धा नदीच्या काठावरील नायगाव घुग्घुस येथील रहिवासी राकेश जेणेकर (27) व शुभांगी भोंगळे (24) या प्रेमीयुगुलाने व्हिडीओ कॉल करीत उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात मुलीचा मृत्यू झाला तर मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.#khabarkatta
एकाच गावातील रहिवासी असलेल्या राकेश व शुभांगी या प्रेमीयुगलाचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र विवाहाला घरून विरोध होता. त्यामुळे दाेघांनीही विष प्राशन करीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मुलीचा मृत्यू झाला तर मुलगा गंभीर अवस्थेत खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे आत्महत्येचा हा प्रयत्न व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून करण्यात आला होता. शहरातील गांधीनगर निवासी राकेश जेणेकर (27) व रामनगर येथे राहणारी शुभांगी भोंगळे (24) हे दोघे प्रियकर प्रेयसी असल्याची माहिती आहे. दुपारी दोघांनी एकमेकांना व्हिडीओ कॉल च्या माध्यमातून संपर्क साधत उंदीर मारण्याचे औषध प्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केला.#chandrapur
सदरची बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ मुलीला रुग्णालयात हलविले. मात्र गंभीर अवस्थेत मुलीने प्राण सोडले तर दुसरीकडे राकेश हा सध्या श्वेता हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. आत्महत्येमागील कारण अजूनही अस्पष्ट असल्याने प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे घुग्घुस पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आसिफराजा शेख यांनी सांगितले. दरम्यान मुलावर मोठ्या प्रमाणात कर्ज झाले होते. त्यातून दोघांमध्ये वाद झाला होता अशीही माहिती समोर येत आहे.
