चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई लेखी परीक्षा; 2 एप्रिल 2023 रोजी...#Chandrapur District Police Constable Written Exam; On 2 April 2023 - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई लेखी परीक्षा; 2 एप्रिल 2023 रोजी...#Chandrapur District Police Constable Written Exam; On 2 April 2023

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर :

जिल्हा पोलीस शिपाई 2021 साठी घेण्यात आलेल्या शारिरीक चाचणी मध्ये विहीत गुणांनी उत्तीर्ण झालेल्या व लेखी परिक्षा करीता पात्र ठरलेल्या उमेदवारापैकी चेस्ट क्रमांक 2018 ते 10715 असे एकुण 1039 पुरुष उमेदवारांची लेखी परिक्षा 02 एप्रिल 2023 रोजी सकाळी 8.30 वाजता मातोश्री विद्यालय, चंद्रपूर येथे घेण्यात येणार आहे.#khabarkatta Chandrapur

तसेच चेस्ट क्रमांक 10716 ते 16481 असे एकुण 455 पुरुष उमेदवार आणि चेस्ट क्रमांक 12877 ते 17040 असे एकुण 644 महिला व 01 तृतीयपंथी उमेदवार यांची लेखी परिक्षा 02 एप्रिल 2023 रोजी सकाळी 8.30 वाजता सेंट मायकल स्कुल, वाबाजार जवळ, रामनगर रोड चंद्रपूर येथे घेण्यात येणार आहे.

लेखी परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र हे महाआयटी विभागामार्फत ऑनलाईन पध्दतीने डाऊनलोड करण्यास उपलब्ध आहे. तसेच त्यांनी आवेदन अर्जात दिलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस द्वारे कळविण्यात येत आहे. लेखी परिक्षेसाठी उमेदवारांनी वरील नमुद संबंधीत परिक्षा केंद्रावर परिक्षेच्या 02 (दोन) तास अगोदर म्हणजे 02 एप्रिल 2023 रोजी सकाळी 6.30 वाजेपर्यंत 02 एप्रिल 2023 रोजी सकाळी पोहचणे आवश्यक आहे.#khabarkatta Chandrapur

Pages