खबरकट्टा / चंद्रपूर: थोडक्यात वृत्त
भद्रावती तालुक्यातील मांगली येथे दरोडेखोरानी जगन्नाथ बाबा मंदिर येथील दान पेटी फोडत दोन व्यक्तींची निघृण हत्या केल्याची बाब आज सकाळी समोर आली आहे.
मधुकर खुजे, बाबुराव खारकर असे मृतकचे नाव आहेत. या दोघांचे मृतदेह जगन्नाथ महाराज मठात सापडलेत.घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपासाला सुरुवात केली आहे.
मंदिरातील दानपेटी गायब असल्याने चोरी करण्यासाठी आलेल्या चोरांनी हत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.ही हत्या लोखंडाच्या सबली नी केली आहे.दरोडे खोर दान पेटी घेऊन पसार झाले आहे.जिह्यात गुन्हेगारी चा ग्राफ वाढत असताना पोलिसांना आणखी या घटनेने चिंताग्रस्त केले आहे.दुहेरी खूनाच्या या घटनेने गाव हादरून गेले आहे.पोलिसांचा मोठा ताफा या ठिकाणी असून आरोपीचा मागोवा घेतला जात आहे.
भद्रावती शहरातील डिफेन्स मधील एटीएम मशीन फोडल्याचीही घटना रात्रो घडल्याची माहिती प्राप्त झाली आहे.