वाहनांच्या कागदपत्रात थोडीही त्रुटी आढळली तर आरटीओंकडून थेट सामान्यांच्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला जातो; मात्र स्वत:चे कार्यालय, कर्मचाऱ्यांकडे असलेल्या वाहनांची अवस्था कधी बघितली काय, कार्यालय तसेच कर्मचाऱ्यांच्या काही वाहनांना साधे इन्शुरन्स, पीयूसी नसल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे सामान्यांवर कारवाई करणारे आरटीओ कार्यालय आता स्वत:च्या तसेच कर्मचाऱ्यांच्या वाहनांवर कारवाई करणार का, हा प्रश्न आता सामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत.#RTO
सर्वसामान्यांना नियम आहे, मग आरटीओ कार्यालय, पोलिस कर्मचारी यांना नियम नाही का, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. काही ठिकाणी तर जुने वाहन वापरले जाते. तर काही वाहनांना कागदपत्र नसल्याचे दिसून येते.#khabarkatta
कुठलाही नियम हा सर्वांनाच सारखा आहे. नियमानुसारच काम करणे अपेक्षित असते; मात्र काही वेळा कर्मचारी नियम तोडतात. शासकीय वाहनांचा विमा डायरेक्ट ऑफ इन्शुरन्स यांच्याकडून काढला जातो; मात्र कधी कधी याकडे दुर्लक्षही होत असल्याचे काहीचे म्हणणे आहे.#chandrapur
मार्च एन्डिंगच्या नावावर या महिन्यात जागोजागी वाहनचालकांवर कारवाई होताना दिसत आहे. यामध्ये वाहतूक पोलिसही मागे नाही. चौकाचौकात तसेच शहराबाहेरील रस्त्यावर वाहनांची तपासणी करून दंड आकारत आहे. आरटीओकडूनही वेळोवेळी वाहनांची तपासणी केली जाते. वाहनांचे कागदपत्र मागितले जाते.
इन्शुरन्स, वाहन परवाना, पीयूसी आदींची तपासणी केली जाते. कागदपत्रे नसेलतर वाहनधारकांना दंड भरावा लागतो. वाहनांची तपासणी केलीच पाहिजे, यामुळे वाहनधारकांना एक शिस्त लागते; मात्र कार्यालयातील तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या वाहनांचीही तपासणी केली पाहिजे, असे सामान्यांचे म्हणणे आहे.

