सिंदेवाही येथून तीन किलोमीटर अंतरावरील लाडबोरी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळांचे शिक्षक संपावर असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दोन दिवसांपासून शाळा बंद असल्याने विद्यार्थी व त्यांचे पालक संतापले आहेत. गुरुवारी सकाळी विद्यार्थ्यांनी शाळेच्या गणवेशातच रस्त्यावर उतरून वाहतूक अडवून धरली. सिंदेवाही ते नवरगावकडे जाणाऱ्या मार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या.
अचानक विद्यार्थी रस्त्यावर आल्याने गावातील नागरिकसुद्धा या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहिले. विद्यार्थ्यांच्या चक्का जाम आंदोलनाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून वायासारखी तालुक्यात पसरली. त्यामुळे सिंदेवाही पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक तुषार चव्हाण यांनी घटनास्थळी विद्यार्थ्यांच्या भावाना जाणून घेतल्या व पंचायत समिती सिंदेवाहीचे गटविक अधिकारी अक्षय सुक्रे यांनीही घटनास्थळी भेट दिली. त्यांनी दोन शिक्षक पाठवितो, असे तोंडी आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थी शांत झाले.
अखेर शाळेत दोन पाठविण्याचे तोंडी आश्वासन दिल्यानंतर प्रशासकीय तोडगा काढत मार्ग मोकळा करण्यात आला. शिक्षक ऐन परीक्षेच्या काळात विद्याथ मोठे शैक्षणिक नुकसान होत अस शाळेतील वर्ग 1 ते 7 मधील विद्यार्थ्यांनी रास्ता रोको केले.#khabarkatta